शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये खुद्द संचालकच 'पॉर्न व्हिडीओ' पाहतो तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:20 IST

ग्रुपमधील शिक्षिकांकडून तक्रार दाखल : शिक्षिकांमध्ये निर्माण झाली असंतोषाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वायफड येथील एका शिक्षण संस्थेतील संचालक तथा जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 'पोर्न व्हिडीओ' पोस्ट केले. दरम्यान, ग्रुपमधील शिक्षिका आणि इतर सदस्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. संतप्त शिक्षिकांनी थेट पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक तसेच शिक्षणमंत्र्यांकडेच तक्रार पाठवून त्या संचलकाविरूद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, भारतीय न्याय संहिता २०२३, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा व इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

वायफड येथील एका शिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाळा महाविद्यालये चालविली जातात. संस्थेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये २७२ सदस्य आहेत. ग्रुपमध्ये अनेकदा सूचना आणि दिशानिर्देश पाठविले जातात. या ग्रुपमध्ये शिक्षण संस्थेचा संचालकही आहे. त्याने त्या ग्रुपमध्ये अश्लिल व आक्षेपार्ह पॉर्न व्हिडीओ प्रसारित केले. तसेच ग्रुपमध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओदेखील फॉरवर्ड करत असून, मद्यपानाला प्रोत्साहन देत आहे. संचालकांकडून कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ करणे सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याची तक्रार सायबर पोलिसांकडे प्राप्त झाली असून सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. 

"यासंदर्भात माझ्यासमोर अद्यापपर्यंत हे प्रकरण आलेले नाही. तरी मी प्रकरणाची चौकशी करुन तुम्हाला माहिती देतो." - पराग पोटे, पोलिस निरीक्षक, वर्धा शहर

टॅग्स :wardha-acवर्धाEducationशिक्षण