शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

कापूस विक्रीसाठी आमचा नंबर केव्हा? शेकडो शेतकरी करताहेत विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:10 IST

सीसीआयला कापूस देण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, नाममात्र गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी आमचा नंबर केव्हा लागणार अशी विचारणा बाजार समितीकडे करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सीसीआयला कापूस देण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, नाममात्र गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी आमचा नंबर केव्हा लागणार अशी विचारणा बाजार समितीकडे करीत आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. इतकेच नव्हे तर व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाला नाममात्र भाव देत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस देण्याची तयारी दर्शवित नोंदणीही केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांना कापूस विकता यावा यासाठी सीसीआयचे केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. समुद्रपूर बाजार समितीकडे ६,८६५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे. मात्र, मजूर नसल्याने सुदर्शन कॉटन जिनिंग जाम येथे १५ गाड्या, श्रीकृष्ण जिनिंग धोंडगाव येथे २० गाड्यांमधीलच कापसाची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे मागील १४ दिवसांत केवळ २४० गाड्यांमधीलच कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरीही आमचा नंबर केव्हा लागेल अशी विचारणा करण्यासाठी बाजार समितीत गर्दी करीत आहेत.

तक्रारीची घेतली दखलकापूस खरेदीत सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार प्राप्त होताच एस. पी. गुघाने व यु. एस. कापकर यांच्या समितीने समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून चौकशी केली. इतकेच नव्हे तर सीसीआयला पाठविलेल्या कापूस गाड्यांची यादी व नोंदणी झालेल्या रजिस्टरची तपासणी केली. परंतु, या चौकशी समितीच्या हाती सावळा गोंधळ झाल्याबाबतचे कुठलेही पुरावे लागलेले नाही. तसा अहवालही वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.

सचिवांनी केला शेतकऱ्यांचा गैरसमज दूरशुक्रवारी सुमारे १०० च्या वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीवर धडक देऊन आमचा नंबर केव्हा लागेल अशी केली. त्यावेळी बाजार समितीचे सचिव शंकर धोटे यांनी पुढे येत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकºयांचे समाधान न झाल्याने त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवून परिस्थितीची माहिती नायब तहसीलदार महेंद्र सुर्यवशी यांना दिली. शिवाय प्रत्येक दिवशी किमान २०० गाड्यांमधील कापूस घेण्याच्या सूचना सीसीआयला देण्याची मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली.

 

 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी