मागण्या मान्य होताच नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची सांगता
By Admin | Updated: August 25, 2016 00:46 IST2016-08-25T00:46:52+5:302016-08-25T00:46:52+5:30
गत सात दिवसांपासून न.प. कमचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

मागण्या मान्य होताच नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची सांगता
आर्वी : गत सात दिवसांपासून न.प. कमचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामुळे बुधवारी सायंकाळी उपोषणाची सांगता झाली. सातही उपोषणकर्त्यांना रस पाजून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी उपोषण सोडविले.
नगर परिषद कर्मचारी संघटनेने केलेल्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन आणि तीन महिन्यांचे सफाई कामगारांचे वेतन त्वरित देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी शिंदे यांनी लेखी स्वरूपात दिली. यामुळे कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. सात दिवसांत संजय अंबोरे, नरेंद्र मानकर, किशोर नेवारे, सुरेंद्र खडसे, राजू उईके, अमोल शेटे व शिवाजी विमोटे हे आजपर्यंत आमरण उपोषण करीत होते.
न.प. मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या मागण्यांमध्ये वेतनासह सफाई कामगारांची पेन्शन आणि कुटूंब वेतन धारकांचे तीन महिन्यांचे वेतन देण्यात येईल. इतर कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांची पेन्शन आणि दोन महिन्यांचे कुटुंब वेतन देण्यात येईल. सफाई कामगारांना राखी अॅडव्हांस पद देण्यात येणार आहे. शासनाकडून अतिरिक्त अनुदान प्राप्त झाल्यानंतर इतर मागण्यांप्रमाणे वेतन देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी शिंदे यांनी लेखी स्वरूपात कर्मचारी संघटनेला सांगितले. मागण्या मान्य आंदोलन स्थगित केले.(तालुका/शहर प्रतिनिधी)