शेतातील गहू पेटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:35 IST2018-03-05T23:35:38+5:302018-03-05T23:35:38+5:30

शेतातील गहू पेटविला
आॅनलाईन लोकमत
घोराड : शेतात काढणीच्या स्थितीत असलेला गहू अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घोराड लगतच्या जुनगड येथे घडली. या आगीत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची मागणी या पिडीत शेतकºयाने केली आहे.
जुनगड येथे लिला पंजाब नेहारे यांचे शेत आहे. त्यांनी यंदाच्या रबी हंगामत या शेतात पेरणी केली. गहू काढणीच्या स्थिती आला होता. सध्या मजुरांची कमतरता असल्याने मजूर मिळताच गहू काढू, अशी अपेक्षा शेतकºयाने ठेवली होती. या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला आज सकाळी अचानक त्याच्या शेतातील गहू जळाल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्याने शेताकडे धाव घेऊन पाहणी केली असता सुमारे एक एकरातील गहू जळून खाक झाल्याचे समोर आले.
हाताशी आलेला घास गेल्याने या शेतकऱ्याची आर्थिक कोेंडी झाली आहे. ही आग नेमकी कोणी लावली याचा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला गावकऱ्यानी दिल्याचे समजते. मात्र भीतीपोटी शेतकरी या तक्रारीकरिता टाळत असल्याचे सांगण्यात येत आहे.