शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कलम 188 म्हणजे काय रे भाऊ? कोरोनायनात 596 जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेशही देऊ शकतात, वा निर्गमित करू शकतात. या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात येतो. विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की, ती व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरते.

ठळक मुद्देजिल्ह्यात पोलिसांनी केली यशस्वी कारवाई : लाखोंचा दंड केला वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना या महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने लॉकडाऊन होते, तर त्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन झाले. या कोरोना संकटकाळात मागील दीड वर्षात पोलिसांनी ५००पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले. अदखलपात्र गुन्ह्यांची तीव्रता आजमितीस नागरिकांना उमगत नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपला आहे. मात्र, आता कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेने धडकी भरली आहे. हिंगणघाट, वर्धा, आर्वी, सेलू या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून आले.  कोरोनाचा प्रसार गर्दीद्वारे होतो आहे.  संचारबंदी काळात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यासाठी कलम १८८नुसार गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. संचारबंदी नियम लागू झाल्यापासून मे २०२१पर्यंत ४९६ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्यापासून १५ हजारांवर नागरिकांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून गर्दी आवरताना आजही पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे. याला नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटात केवळ पोलीस विभागच रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य नित्यनेमाने आणि प्रामाणिकपणे करीत असल्याचे दिसून आले. तोकडे मनुष्यबळ असतानाही पोलीस दलाने आपली जबाबदारी योग्य रितेने पार पाडली. मात्र, महसूल, नगर पालिका यांच्यासह इतर विभागांनी केवळ फोटोसेशनपुरतेच कारवाईचे ढोंग करून स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. त्यामुळे अद्याप नागरिकांना कलम १८८चे महत्व समजले नसल्याचे दिसून येत आहे.

काय आहे कलम १८८ १८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होत असतात. तसेच शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेशही देऊ शकतात, वा निर्गमित करू शकतात. या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात येतो. विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की, ती व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरते.

काय आहे शिक्षेचे प्रावधान...- कलम १८८ या कायद्याच्या तरतुदीनुसार फक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक  महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.  त्यामुळे नागरिक अजूनही जागरुक झालेले दिसत नाही.

१८८ जामीन पात्र कलम - हा जामीनपात्र गुन्हा असून, मोठ्या संख्येने पोलीस कारवाईचे आकडे समोर आले आहेत. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी न्यायालयासमोर येतील.  त्यातील काहींना दंड, शिक्षादेखील मिळेल तर काही निर्दोष सुटतील. भविष्यातील या कार्यवाहीचा आज समाजावर फारसा फरक पडताना दिसत नाही. हे मात्र, वास्तव आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस