भारत बचाओ रॅलीचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:47 IST2018-03-17T00:47:56+5:302018-03-17T00:47:56+5:30

भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

Welcome to the India Bachao Rally! | भारत बचाओ रॅलीचे जल्लोषात स्वागत

भारत बचाओ रॅलीचे जल्लोषात स्वागत

ऑनलाईन लोकमत
वर्धा : भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश चौहान यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी भारत बचाओ रॅलीचा उद्देश उपस्थितांना सोप्या शब्दात सांगितला. त्यानंतर रॅलीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून शास्त्री चौक भागातील हनुमान दुर्गा माता मंदिर गाठले. येथे पार पडलेल्या कार्यक्रमानंतर रॅली यवतमाळच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीचा समारोप दिल्ली येथे होणार आहे. कार्यक्रमाला मुकेशनाथ महाराज, हेमंत जोशी, प्रमोद मुरारका, अशोक कठाणे, सुशील दिक्षित, अभिषेक बेद, शेखर आगरकर, अशोक टट्टे, विद्यानंद भाटीया, जगदीश टावरी, अनिकेत उमाटे, जयस्वाल, सोहन ठाकूर, प्रशांत बुर्ले, राजू ठक, भाऊ यादव, सुनील पटेल, माया उमाटे, सीमा शुक्ला, कमल गिरी, प्रिया गिरी, भावना वाडीभस्मे, हंसा पांडे, नयना पांडे, श्रद्धा तिवारी, शीला गिरी, मंदा तिवारी, नितू भारद्वाज, सुचिता पाठक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्व हिंदू महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

Web Title: Welcome to the India Bachao Rally!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.