विविध स्पर्धांमधून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

By Admin | Updated: May 19, 2016 01:49 IST2016-05-19T01:49:29+5:302016-05-19T01:49:29+5:30

आकर्षक वेशभुषा, केशभुषा, अनुरुप दागिन्यांचा साज, सहावारी, नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रुपापासून मारवाडी,

Weddings of looted prizes from various competitions | विविध स्पर्धांमधून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

विविध स्पर्धांमधून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

कलागुणांना मिळाले व्यासपीठ : गायन, नृत्य, अभिनयाद्वारे स्वत:ला केले मुक्त
वर्धा : आकर्षक वेशभुषा, केशभुषा, अनुरुप दागिन्यांचा साज, सहावारी, नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रुपापासून मारवाडी, बॉलिवूड अशा विविध अस्मितेचे प्रतिनिधित्व करीत सज्ज असलेल्या सख्या, जोशपूर्ण नृत्य, तालासुरात मंजुळ आवाजात सादर होणारी गाणी, सासु-सुनेचे संबंध, पाणीप्रश्न अशा विविध विषयांसह सादर झालेले अभिनय, सोबत बक्षिसे आणि मनोरंजनाची लयलुट या उत्साही वातावरणात महिलांनी मेजवानीचा आनंद घेतला.
वर्धा येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला सुरक्षा पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक ममता अफुने समाजसेविका उषा काळे, ज्योती भगत, संध्या देशमुख, नागपूर येथील नृत्यांगणा शिवानी सावदेकर, वैशाली चव्हाण, वर्धा जिल्हा कार्यालय प्रमुख उमेश शर्मा, वर्धा जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर उपस्थित होते.
यावेळी सहभागी सखींनी गायन, वादन, नृत्य व अभिनय सादर करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. ‘सिर्फहुनर ही है पहचान’ या शोच्या पार्श्वभूमिवर हा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर, दूरदृष्टी असलेले ख्यातनाम निर्देशक करण जोहर, प्रसिद्ध नृत्यांगणा व अभिनेत्री मलाईका अरोरा यांच्या अनुभवी परीक्षणातून हे सर्व कलावंत तावून सुलाखून बाहेर निघणार आहेत. कलर्स चॅनलवर ३० एप्रिलपासून ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित केला जातोे. या पार्श्वभूमिवर सखींसाठी यावेळी ‘सखीज गॉट टॅलेंट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नृत्य, गायन व इतर कलागुण या तीन गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या सखींना आकर्षक बक्षिसे देण्यात आलीत.
कलर्स चॅनेलने पुन्हा एकदा कलाकारांच्या अंगिभुत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच कलाकारांकरिता उपलब्ध करून दिला आहे. सखीज गॉट टॅलेंट कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना ढोल-ताशा पथकाने करण्यात आली. त्यांनी विविध कला सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. अतिशय जोशपूर्ण प्रदर्शनाने कार्यक्रमात रंगत आली. याच शृंखलेत साक्षी डान्स क्लासेस तर्फे ग्रुप डान्स करण्यात आला. तसेच आशिष डान्स क्लासेसतर्फे सखीमंच सदस्यांचा ग्रुप डान्स करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक ज्योती भगत आणि सुप्रसिद्ध गायिका संध्या देशमुख यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी मंच संयोजिका प्रियंका मोहोड यांनी परिश्रम घेतले.(उपक्रम प्रतिनिधी)

गत वर्षभरात कलर्स चॅनेल आणि लोकमत सखी मंच द्वारे अनेक कार्यक्रमांची श्रृंखला संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोव्यात यशस्वीरित्या राबविली गेली. अनेक उल्लेखनीय कार्यक्रम यांतर्गत घेतले गेले. याच श्रृंखलेत परत एकदा कलर्स चॅनेल लोकमत सखी मंच सदस्यांसाठी ‘‘सखीज गॉट टॅलेंट’’ हा उपक्रम आणला होता. स्त्रियांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून जसं लोकमत सखी मंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात रूजलंय तसेच कलर्स चॅनेलने देखील आपल्या नावीन्यपूर्ण आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या कौटुंबिक मालिका आणि इतरही कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर स्वतंत्र पकड निर्माण केली आहे. आणि म्हणून संयुक्तरित्या राबविलेले प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाले आहे. यात पुन्हा सखींच्या महिलांच्या कलागुणांना वाव देणारा सखीज गॉट टॅलेंट हा कार्यक्रम म्हणजे कलाकारांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा ठरला.

Web Title: Weddings of looted prizes from various competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.