कारमधून शस्त्रसाठा जप्त
By Admin | Updated: January 10, 2016 02:36 IST2016-01-10T02:36:03+5:302016-01-10T02:36:03+5:30
पोलिसांनी संशयावरुन कारची झडती घेतली असता त्यातून दोन गुप्ती, लोखंडी व लोखंडी रॉड, असा शस्त्रसाठा जप्त आढळला. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी केली.

कारमधून शस्त्रसाठा जप्त
संशयावरुन झडती : पाच जणांना अटक
तळेगाव (श्यामजीपंत) : पोलिसांनी संशयावरुन कारची झडती घेतली असता त्यातून दोन गुप्ती, लोखंडी व लोखंडी रॉड, असा शस्त्रसाठा जप्त आढळला. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिथुन अवतारसिंग बावरी (२४) रा. इंदिरानगर कारंजा (घाडगे), विलास रमेश शेंडे (३०) रा. हिंगणा रोड नागपूर, अंकुश सोनवणे (२२) रा. म्हाडा कॉलनी, नागपूर, वेणूगोपाल देशमुख रा. एमआयडीसी कॉलनी नागपूर तसेच नीलेश पिंपळे रा. वानाडोंगरी, नागपूर अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तळेगाव (श्या.पंत.) पोलीस रस्ता तपासणीदरम्यान नागपूर येथून येणाऱ्या लाल रंगाच्या कारला अडविण्याचा प्रयत्न केला. यात कार चालकाने वाहन थांबविले नसल्याने त्याचा पाठलाग करून महामार्गावरील ओरिएंटल टोल नाल्याजवळ तळेगाव आणि कारंजा पोलिसांनी तपासणी केली. यात विविध शस्त्र आढळल्याने कार ताब्यात घेण्यात आली.
या कारमध्ये असलेल्या पाचही जणांना अटक ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोबाईलसह इतर साहित्य व कार असा एकूण ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारमध्ये सापडलेल्या शस्त्रावरून कारमधील पाचही युवक दरोडा घालण्याच्या वा रस्त्याने लुटमार करण्याच्या बेतात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.(वार्ताहर)