लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : या संपूर्ण आठवड्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे केळी बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत किमान ४६ अंश तापमान केळीचे पिक सहन करु न शकल्याने ते वाळायला व धड आपोआप गळायला सुरुवात झाली आहे.एकेकाळी केळी पीक हे पवनारचे वैभव होते. तापमानात वाढ, बाजारभाव, भारनियमन, पाण्याची खालावलेली पातळी व अनेक कारणामुळे सदर पिक नामशेष झाले. परंतु गत तीन -चार वर्षापासून कुंदन वाघमारे या तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केळीचे पिक घेतले व चांगला नफा कमविला त्यांनीच परिसरात केळी पिकाचे तंत्र वाढावे म्हणून स्वखर्चाने कार्यशाळा घेवून परिसरातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिल्याने केळीचे क्षेत्र वाढले. भावही बरा मिळू लागला परंतु या वर्षी अचानक तापमानात वृद्धी झाल्याने केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे भावही कमी मिळायला लागला आहे. कृषी विभागाने ताबडतोब पंचनामे करण्याची मागणी दुष्यंत खोडे, निलेश वाघमारे , इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.केळीचा कॅलिफोर्निया सेलू तालुका झाला रिताखानदेशानंतर केळीसाठी प्रसिध्द असलेला भाग म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका. तालुक्यातील प्रत्येक गावात केळी पिकांचे उत्पादन घेतले जात होते. देशाच्या विविध भागातून व्यापारी केळी खरेदीसाठी येथे येत होते. कालांतराने केळीची लागवड कमी होत गेली व हा कॅलिफोर्निया रिकामा झाला.
केळीच्या बागा करपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST
गत तीन -चार वर्षापासून कुंदन वाघमारे या तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केळीचे पिक घेतले व चांगला नफा कमविला त्यांनीच परिसरात केळी पिकाचे तंत्र वाढावे म्हणून स्वखर्चाने कार्यशाळा घेवून परिसरातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिल्याने केळीचे क्षेत्र वाढले.
केळीच्या बागा करपल्या
ठळक मुद्देतापमान ४६ अंशांवर । पाने जळाली, घड कोसळून पडले