'आम्हाला नको तुमचे बिनकामाचे मोबाईल...'; वर्धा जिल्ह्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले ६३८ मोबाईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 02:37 PM2021-08-20T14:37:56+5:302021-08-20T14:43:00+5:30

Wardha News अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार वर्धा प्रकल्प १ व २, नागरी प्रकल्प वर्धा आणि सेलू यांनी ६३८ मोबाईल परत केले.

We don't want your useless mobile ...; Anganwadi workers in Wardha district returned 638 mobiles | 'आम्हाला नको तुमचे बिनकामाचे मोबाईल...'; वर्धा जिल्ह्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले ६३८ मोबाईल 

'आम्हाला नको तुमचे बिनकामाचे मोबाईल...'; वर्धा जिल्ह्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले ६३८ मोबाईल 

Next
ठळक मुद्देइंग्रजी अ‍ॅपमुळे वाढली डोकेदुखी वारंवार मागणी करूनही शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

 वर्धा  : केंद्र शासनाने कॉमन अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅप (कॅस) बंद करून नवीन पोषण ट्रॅकर अ‍ॅप इंग्रजीत दिल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडी कर्मचा-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मोबाइलमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार वर्धा प्रकल्प १ व २, नागरी प्रकल्प वर्धा आणि सेलू यांनी ६३८ मोबाईल परत केले.

शासनाने दिलेले मोबाइल वारंवार खराब होत असल्याने दुरुस्त करण्याचा खर्च सेविकांकडून घेतला जात आहे. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने यापूर्वीच सूचना दिली होती. त्यानंतरही चार बैठका झाल्यात, परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी, अंगणवाडीसेविकांना मोबाइल परत करावे लागले, असे कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले. अंगणवाडीसेविकांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कक्षात हे मोबाइल सोपविले. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, सिटूचे भय्या देशकर, वंदना कोळणकर, मंगला इंगोले, मैना उईके, अलका भानसे, अर्चना मोकाशी, सविता जगताप, संजय भगत, अरुणा नागोसे, वंदना खोब्रागडे, शबाना खान, रेखा कोठेकर, माला भगत, ज्योती कुलकर्णी, निर्मला देवतळे, चंदा मेसराम, वंदना बाचले, ज्योती फुलझले, सीमा फुलझले, कविता केळवतकर, प्रज्ञा ढाले, संगीता मोरे, ममता देशकर, शीला हिवसे, निर्मला चौधरी, आरती दोडके, वीणा जांभुळकर, नम्रता बोंबाडे, संगीता कोहळे, रंजना नेमाडे, अर्चना वानखेडे, सुनंदा महाजन यांनी केले.

Web Title: We don't want your useless mobile ...; Anganwadi workers in Wardha district returned 638 mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल