शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती सिखाती है साहाब...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:50 IST

बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही.

ठळक मुद्देबालकदिन विशेष : पाठ्यपुस्तकाअभावी चिमुकल्यांच्या हातात भिक्षापात्र

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. कचऱ्यातून आपल्या आयुष्याचा शोध घेणारेही आपल्याला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहावयास मिळतात. समाजही सुशिक्षीततेचा आव आणून त्यांना धुडकावून लावतात. अनवाणी पाय आणि अर्ध झाकलेल्या शरीराने फिरत असणाऱ्या बालकांना त्यांच्या या आयुष्याबाबत विचारले तर ‘हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती शिखाती है साहाब...!’ अशी केविलवानी व्यथा ते मांडतात. त्यांचे हेच शब्द कानावर पडताच अंगावर काटा उभा होतो. तेव्हा दरवर्षी बालकदिन साजरा करतो तरीही या मुलांवर कुणाचे लक्ष का पडले नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य बालकांना हाती भिक्षापात्र घ्यायला भाग पाडतात.शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच गल्लीबोळात ही मुले भीक मागून जीवन जगत आहे. हातात पाठ्यपुस्तक घेण्याऐवजी भिक्षापात्र आल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर पोटाचा प्रश्न थोपविला गेला आहे.उन्हाचे चटके, हवेचा मारा आणि थंडीचा गारठा झेलत उघड्यावर जीवन जगणाºया या गोंडस बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ८ ते १२ वर्ष वयोगटातील ही कोवळी मुलं पोट भरण्याची सोय करण्यासाठी लग्न समारंभ किंवा हॉटेलमधील उष्टे अन्न खाऊन जगतात. उघड्यावरचे जीवन जगणाऱ्या चिमुल्यांना शरिराच्या स्वच्छतेचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांची लागणही त्यांना होते. शिवाय कुणाचाही वचक व धाक नसल्याने ही मुले व्यसनाधीनतेकडे आणि नंतर गुन्हेगारीकडे वळतात; पण या धकाधकीच्या आभासी जगात त्या बेघर असलेल्या चिमुकल्यांप्रती समाजमनही निष्ठूर झाल्याचे दिसून येत आहे.उपचाराची वानवा असल्याने या बालकांना ताप, खोकला, हातापायावर सुजन तसेच कावीळ सारखे आजार असल्याचेही एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. अशा बिकट परिस्थित मिळेल ते काम करुन दिशाहीन जीवन जगत आहे. त्यांना शिक्षणाचा गंध नसल्याने शिक्षणाचा अ,ब,क,ड ही माहीत नाही. त्यामुळे देशाची भावी पिढी बालकांमध्ये पाहणाºया या समाजाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. या बालकांना जगण्याचा मार्ग दाखविला तरच खºया अर्थाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विचारातील ‘बालक दिन’ साजरा होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :children's dayबालदिन