पाणीच पाणी चोहीकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:22 PM2019-07-30T23:22:58+5:302019-07-30T23:23:25+5:30

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे.

Water is water ... | पाणीच पाणी चोहीकडे...

पाणीच पाणी चोहीकडे...

googlenewsNext
ठळक मुद्देनदी-नाल्यांना पूर : लालनाला व नांद प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; गावांना सतर्कतेचा इशारा

- भक्ती सोमण

पाणी... या दोन शब्दातच संपूर्ण जगणं सामावलेलं आहे. पाण्याशिवाय तर आपला दिवसही जाऊ शकत नाही. त्यामुळे पेयसंस्कृतीत पाण्याचे महत्त्व मोठे आहे.
लहान असल्यापासूनच तहान लागल्यावर पाणी प्यायचं, हे आपल्या मनावर बिंबत जातं, त्याप्रमाणे रोजच्या जगण्यात त्याची अंमलबजावणीही होतेच होते. आपल्या दिवसाची सुरुवात होते ते पाणी पिऊनच. त्यानंतर मग, दूध, चहा, कॉफी यापैकी काही प्यायले जाते. आपण थकून घरी आलो, तरी पाणी प्यायल्यावरच बरं आणि शांत वाटतं. म्हणूनच पाण्याने आपलं जीवन व्यापलं आहे, असं पुन्हा-पुन्हा वाटून, त्याच्याविषयी कृतज्ञताच वाटते.
पाण्याच्या चवीतही ठिकाणानुसार फरक पडतो. काही ठिकाणी पाणी जड असतं, तर काही ठिकाणी वेगळीच चव असते. या पाण्याची खरी गरज दुष्काळाच्या काळात जाणवते. त्याची झळ बसलेल्यांना परत पाण्याच्या दुर्भीक्षाचा सामना करावा लागू नये, यासाठी अनेक लोक आता झटत आहेत. त्याचे परिणामही दिसत आहेत. शुद्ध पाणी मिळणे, ही आपली गरज आहेच. त्यासाठी दूषित जलस्रोत असलेल्या गावांतील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे, यासाठी राज्यातील ८९ गावांना प्युरिफायर यंत्राद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वाचनात आले.
पाण्याच्या महत्त्वाविषयी आहारतज्ज्ञ कांचन पटवर्धन म्हणाल्या, ‘शरीरात पाण्याचा अंश ८० टक्के असतो. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी पिणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसाला साधारण ३ ते साडेतीन लीटर पाणी अवश्य प्यावे. डोकेदुखी, थकवा, पाय आखडणे, पोट बिघडणे या गोष्टी टाळण्यासाठी, तसेच त्वचेला तजेला येण्यासाठी भरपूर पाणी पिणे केव्हाही चांगलेच.’
पाण्याने विविध प्रकारातून आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्ह करतो, तेव्हा चवीला इतर घटक असतात, पण त्या सर्व घटकांना एकत्र करण्याचं काम करतं ते पाणीच. हिवाळ््यात तर विविध भाज्या आणि पालेभाज्यांचं सूप बनवलं जातं. त्या सुपाची चव विविध पदार्थाने येत असली, तरी हे सर्व घटक एकजीव होतात ते पाण्यानेच. असे तर अनेक पदार्थांविषयीही सांगता येर्ईल. थोडक्यात काय, तर पाणी नुसतं प्या किंवा कशात मिसळून प्या. ते आवश्यकच.
पाण्याचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं स्थान असताना, आपण त्याची योग्य काळजी घेतो का? कारण आज अनेक लोक चांगलं पाणी प्रदूषित करत आहेत. पाण्याची नासाडी तर सर्रासच पाहायला मिळते. आपल्या घरी, रेल्वे फलाटावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय करणं चुकीचेच. उलट ते कसं साठलं पाहिजे, याकडे तर लक्ष दिलं पाहिजे, तसेच जर ते दूषित होत असेल, तर तसे होऊ नये, म्हणून कृतिशील पावलेही उचलली पाहिजेत.
असं म्हणतात की, जी गोष्ट सहज मिळते, तेव्हा त्याची किंमत राहात नाही, असेच जर पाण्याच्या बाबतीत झाले, तर येणारा काळ आपल्यामुळे पुढच्या पिढीसाठी किती त्रासदायक ठरेल, याचा विचार आपणच करायला हवा. म्हणूनच पाण्याचे आपल्यावर जे चिरंतन उपकार आहेत, त्याची परतफेड पाणी शुद्ध, स्वच्छ ठेवून करायला हवी. तरच पुढच्या पिढीला आपण सुदृढ जीवन देऊ शकू. कारण... जल है तो जीवन है...

प्राणिमात्रांसाठी
एवढं करूच!
पाण्याची गरज मोठी गरज प्राण्यांनाही आहे. आजकाल आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात चिमण्या दिसत नाहीत. गाय, बैल तर क्वचित दिसतात. गावांत मात्र, स्थिती बरी आहे, पण या प्राणी-पक्ष्यांसाठी आपण काही करू शकलो तर... प्रत्येक कुटुंबाने घराच्या खिडकीत जर प्लॅस्टिकची वाटी बांधून त्यात पाणी भरून ठेवले, तर या पक्ष्यांना पिण्यासाठी सोय होईल. याशिवाय, गाय, बैल यांना पाणी पिण्यासाठीही सोसायटीच्या बाहेरचा भाग आपण नक्कीच तयार करू शकतो. बरेच निसर्गमित्र पक्ष्यांसाठी अशी सोय करत आहेत. मात्र, त्यात वाढ होणे गरजेचे आहे. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्राणिमात्रांच्या पाण्याच्या गरजेचाही विचार करणे गरजेचे आहे. नाही का!

Web Title: Water is water ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.