फुटक्या वितरिका, पाटचऱ्यांमुळे पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: November 7, 2016 00:41 IST2016-11-07T00:41:38+5:302016-11-07T00:41:38+5:30
रबी हंगाम काही दिवसानंतर आला आहे. या दिवसात ओलीत करण्याकरिता बोर धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे.

फुटक्या वितरिका, पाटचऱ्यांमुळे पाण्याचा अपव्यय
रबी हंगाम तोंडावर : वितरिकांची साफसफाई व दुरूस्ती मात्र थंडबस्त्यात
विजय माहुरे सेलू
रबी हंगाम काही दिवसानंतर आला आहे. या दिवसात ओलीत करण्याकरिता बोर धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेले पाणी शेतात पोहोचविण्याकरिता असलेल्या पाटचऱ्या झाडा-झुडपांनी बुजल्या आहेत. यामुळे सोडलेल्या पाण्याचा अपव्यय होवून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नसल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता वितरीकांची साफसफाई व दुरूस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बोर प्रकल्पाच्या पाण्यावर या तालुक्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहचण्याच्या दृष्टीने गत ५० वर्षांच्या काळात शासनाच्यावतीने ठोस पाऊले उचलल्या गेली नाहीत. यामुळे बोर प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताकरिता सोडण्यात आलेले पाणी शेतात जात नसून त्याचा अपव्यय होत आहे. याकडे मात्र संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पाटचऱ्यात व कालव्यांत मोठ्या प्रमाणात झुडपे असल्याने सोडलेले पाणी शेवटच्या शेतापर्यंत जात नसल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न होत नसल्याची ओरड आहे.