सेवाभावी नगरात पाणी समस्या गंभीर
By Admin | Updated: June 20, 2015 02:33 IST2015-06-20T02:33:38+5:302015-06-20T02:33:38+5:30
जीवन प्राधिकरण विभागाची योजना सेवाभावी नगरवासीयांकरिता कालबाह्य आणि कुचकामी ठरत आले.

सेवाभावी नगरात पाणी समस्या गंभीर
सेवाग्राम : जीवन प्राधिकरण विभागाची योजना सेवाभावी नगरवासीयांकरिता कालबाह्य आणि कुचकामी ठरत आले. येथील जलकुंभ असला तरी तो पांढरा हत्ती ठरत आहे. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या योजनेचा कुठलाही उपयोग नागरिकांकरिता होताना दिसत नाही. पावसाला प्रारंभ झाला तरी येथील नागरिकांकरिता ही योजना कुचकामी ठरत आहे.
येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्य मागे आणि खरांगणा (गोडे) मार्गावर सेवाभावी नगर आहे. ही नवीन वसाहत असून येथे सुमारे ३५० घरे आहेत. या वसाहतीत मोठ्या इमारती असून यातून ग्रामपंचायत प्रशासनाला कराच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळत आहे. असे असले तरी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.
कुटकी (तळोदी) येथील धामनदीच्या तिरावर विहीर बनवून वैद्यकीय महाविद्यालयाच्याा टेकडीवरील जलकुंभात पाणी सोडल्या जात होते. येथे वारंवार पाईप लिकेज होत होणे नित्याची बाब झाली. एवढेच नाही तर कुटकी शिवारात मोटर पंप सुरू करायला जाणे सुद्धा जिकरीचे ठरले. अखेर ही योजनाच बंद पडली ती आजही बंदच आहे. ग्रा.पं. प्रशासनाने सेवाभावी नगरातील लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)