सिमेंट नाल्याअभावी पाणी तुडूंब
By Admin | Updated: July 30, 2016 00:33 IST2016-07-30T00:33:27+5:302016-07-30T00:33:27+5:30
सिंदी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ येथील अंगणवाडी परिसरातील नाली तुंबली आहे.

सिमेंट नाल्याअभावी पाणी तुडूंब
आरोग्य धोक्यात : सिंदी(मेघे) ग्रा.पं. च्या वॉर्ड क्रमांक १ मधील प्रकार
वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ येथील अंगणवाडी परिसरातील नाली तुंबली आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असून दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहे. सांडपाणी घरासमोर साचत असून यात डासांची उत्पत्ती होऊन रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या तक्रारीची प्रत पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय येथे देण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्यांकडे, तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यआ तक्रारीतून आला आहे. वारंवार येथील नाली साफ करण्याची मागणी केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. नाली तुंबली असल्याने विद्यार्थ्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सांडपाणी वाहुन जाण्यासाठी सिमेंट नालीची व्यवस्था करावी, अशी मागणी मनोरमा शंभरकर यांनी निवेदनातून केली आहे.
वार्ड नं. १ मधील रहिवासी शंभरकर यांच्या घरासमोर सांडपाण्याचा प्रश्न गत कित्येक वर्षांपासून थंड बस्त्यात आहे. शिवबा व दिंगाबर लांबे यांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर साचून राहाते, याबाबत तक्रारी करूनही गखामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोप शंभरकर यांनी केला आहे.
ज्या भागात रस्त्यावर पाणी साचत आहे त्या भागात एक अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत आज जवळपास २० ते २५ लहान मुले येतात. या पाण्यामुळे ही लहान मुले पाय घसरून पडतात. मुलेच नाही तर वॉर्डातील नागरिकही येथे येवून पडतात. नालीत तुंबलेल्य पाण्यामुळे डास, जलजंतू याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होवून विद्यार्थ्यांना व परिसरातील नगारिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना एखाद्या आजाराची लागण होण्याची शक्यात आहे. शिवाय या पाण्यामुळे येथे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाची राहील, असे शंभरकर यांनी कळविले आहे.
सरपंच, वॉर्डातील सदस्य, ग्राम विकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती दिली असता केवळ स्थळ निरीक्षण करून लवकरच काम करण्यात येईल असे आश्वासन देवून मोकळे झाले. येथील नालीचे बांधकाम करून सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत योग्य उपाय योजना करून आम्हा परिसरातील नागरिकांना व न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)