‘जल, जंगल, जमीन वाचवा’ सायकल अभियान
By Admin | Updated: October 7, 2016 02:20 IST2016-10-07T02:20:59+5:302016-10-07T02:20:59+5:30
वनसप्ताहानिमित्त जल, जमीन, जंगल वाचवा जनजागृती सायकल अभियानाचे आयोजन एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील

‘जल, जंगल, जमीन वाचवा’ सायकल अभियान
१५५ किमी मीटर अंतर : ६० रोव्हर रेंजर व एन.सी.सीचे छात्र सैनिक सहभागी
वर्धा : वनसप्ताहानिमित्त जल, जमीन, जंगल वाचवा जनजागृती सायकल अभियानाचे आयोजन एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना युनिट, रोव्हर रेंजर युनिट व बहार नेचर फाऊंडेशन यांच्या विद्यमाने करण्यात आले होते.
सदर सायकल अभियानाचे उद्घाटन एस.एस.एन.जे. महाविद्यालयाच्या परिसरातून खासदर रामदास तडस व प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय यांनी स्वत: काही दूर सायकल चालवून केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
दोन दिवसीय सायकल भ्रमंतीचे नेतृत्व रोव्हर लिडर तथा एन.सी.सी. अधिकारी मोहन गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, बहार नेचरचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, प्रा. संतोष मोहदरे व वन्यजीव अभ्यासक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. यात ६० रोव्हर रेंजर व एनसीसीचे छात्र सैनिक सहभागी झाले होते. सायकल भ्रमंती दरम्यान सालोड, वर्धा, सेवाग्राम, पवनार, सेलू, हिंगणी व बोरधरण येथे पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी बोरधरण, सालई, आमगाव, रिधोरा डॅम, जामणी, येळाकेळी, पिपरी, सालोड, सेलसुरा व देवळी असे १५५ कि़मी. अंतर पूर्ण करण्यात आले.
सालोड येथे प्रहार इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, वर्धा येथे जिल्हा स्काऊटस् आणि कार्यालयाच्यावतीने जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, गाईड संघटक मंजुषा जाधव, सेवाग्राम येथे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, बोरधरण येथे बोरव्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लुचे, फाटे व जामणी येथे दिनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण जंगले, मुख्याध्यापिका चापडे यांच्या वतीने सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले. सदर अभियानांतर्गत सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरात छात्र सैनिकांनी वृक्षारोपण केले. बोर व्याघ्र प्रकल्प विभागातर्फे जंगल सफारी व बोरधरण परिसर भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. या शिवाय वन्यजीव व जैेवविविधता या विषयावर सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी फाटे यांनी, सापांचे संवर्धन व विषयावर संजय इंगळे तिगावकर यांनी तर पक्षी संवर्धन या विषयावर प्रा. किशोर वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.
अभियान यशस्वी करण्यासाठी अश्विनी घोडखांदे, वैभव भोयर, रवी बकाले, आशिष परचाके, ठाकरे, उमा मसराम, कोमल गोमासे, राजकुमार भोवते, स्वप्नील शिंगाडे, राजू सुरकार, साकीब पठाण, मंगेश रौदळे, निहाल झाडे, गृहरक्षक अमोल तडस यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)