पाणी आटवून केली कोजागिरी

By Admin | Updated: October 16, 2016 01:45 IST2016-10-16T01:45:29+5:302016-10-16T01:45:29+5:30

कोजागिरीला रात्रीला दूध आटवून ते ग्रहण करण्याची प्रथा आहे. शेडनेट पॉलीहाऊस संदर्भात शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे

Water erosion kojagiri | पाणी आटवून केली कोजागिरी

पाणी आटवून केली कोजागिरी

डिसेंबर महिन्यात निवडणूक : अनेकांची पत्नीच्या खांद्यावर बंदूक
प्रभाकर शहाकार  पुलगाव
येत्या डिसेंबर महिन्यात नगराध्यक्षाची निवडणूक आहे. त्याचे आरक्षण जाहीर झाले आहे. नगरसेवकांची निवड जरी प्रभागातून होणार असली तरी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडल्या जाणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्तारूढ व विरोधी गटातील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. परंतु नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी राखीव झाल्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता सर्व राजकीय पक्षांपुढे ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदारांसह राजकीय पक्ष देखील नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याचे समजते.
जवळपास सर्वच राजकीय पक्षाकडे अनेक सक्षम असे कार्यकर्ते असून अनेक नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते; परंतु नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्ष सर्व परिचित व सक्षम अशा महिला उमेदवाराच्या शोधात आहे. शहरातील काही नाव वगळता कुठल्याही राजकीय पक्षाकडे हमखास निवडून, येण्यासारखे महिला उमेदवार दिसून येत नाही. त्यामुळे विद्यमान नगर सेवकांपैकी अनेकांनी आपल्या अर्धागिणीसाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. सर्वच राजकीय पक्षात गटागटाचे राजकारण सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्ता हमसे बढकर कौन म्हणत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसमध्ये उघड उघड दोन गट पडले आहेत. सत्तेत सहभागी असलेले सेना भाजपा एकमेकांपुढे दंड थोपटून उभे आहे. इतकेच नव्हे तर सेना भाजपा मध्येही कार्यकर्त्यांची गटबाजी दिसून येते. इतरकेच नव्हे तर काँग्रेसह देवून दोन्ही समाजाची मते मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असून असे उमेदवार सर्वच पक्षाकडे असल्याचीही चर्चा सुरू आहे. सत्तारूढ काँग्रेसच्या गटबाजीचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात असून काही समक्ष उमेदवारांनी भाजपाच्या नेत्यांच्या भेटी गाठीही घेतल्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता, वर्तविल्या जात आहे. राजकीय दृष्ट्या भाजपा सध्या प्रभाग सभा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग, भूमीपूजन, मेळावे घेवून मतदारांना खुचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसकडून कुठल्याही हालचाली नसून कार्यकर्ते सुस्त असल्याचे दिसून येते. तर भाजपा देवळीसह पुलगाव पालिका ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

Web Title: Water erosion kojagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.