दारूविक्रेत्यांवर महिला मंडळांचा वॉच
By Admin | Updated: September 3, 2014 23:37 IST2014-09-03T23:37:43+5:302014-09-03T23:37:43+5:30
अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या वाढत्या दारू विक्रीला लगाम बसावा. यासाठी विरूळ येथील महिलांनी पुढाकार घेवून गावात दारूबंदीचा निर्णय घेतला. ग्रामसचिवालयात नुकतीच

दारूविक्रेत्यांवर महिला मंडळांचा वॉच
विरूळ (आकाजी) : अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या वाढत्या दारू विक्रीला लगाम बसावा. यासाठी विरूळ येथील महिलांनी पुढाकार घेवून गावात दारूबंदीचा निर्णय घेतला. ग्रामसचिवालयात नुकतीच एक महिलांनी बैठक घेवून गावात दारू विक्रेत्यांना खबरदार यापुढे गावात दारू विकाल तर असा इशाराच दिल्याने गावात दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
ग्रामसचिवालय येथे झालेल्या महिलांच्या या बैठकीत गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत गावातील तरूण मंडळाही मोठ्या संख्येने उपस्थित होती. याबाबत पुलगाव पो.स्टे.चे ठाणेदार तायडे व बीट जमादार सुभाष राऊत यांची महिलांनी भेट घेवून याबाबत सहकार्याची भावना व्यक्त केली. पोलिसांनाही दारूबंदी बाबत जेव्हा सहकार्याची गरज भासेल तेव्हा पुलगाव पोलीस तत्परतेने मदत करेल, अशी ग्वाही ठाणेदार तायवाडे यांनी दिली. परिसरातील रसुलाबाद व वायफड गावात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत आहे. रसुलाबाद ते विरूळ मार्गानेही दारूची विक्री होत असून ड्रमंने दारू विरूळ येथे खुलेआमपणे येत आहे. याकडे पुलगाव पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच साधना उईके, दारूबंदी मंडळाच्या अध्यक्ष शोभा मनवर, अनिता तुराळे, तं.मु.अ. अमोल शेंडे, पो. पाटील निरज तुरके, महिला व गावकरी उपस्थित होते.(वार्ताहर)