शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हिंगणी परिसरात वॉशआऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:29 IST

सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली.

ठळक मुद्देगावठी दारू केली नष्ट : ४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात गावठी दारू नष्ट करून दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण ४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.दारूविक्रीच्या व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या भागात निर्माण झाला होता. शिवाय दारूबंदी असताना अति मद्यप्राशनाने याच भागातील जामणी पारधी बेडा शिवारात एकाचा मृत्यू झाला. दारू विक्रीच्या व्यवसायाचा महिलांना होणारा त्रास व कायदा तसेच सुव्यवस्थेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सेलू, हिंगणी भागांमध्ये ठिकठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात कच्चा मोह रसायन सडवा व गावठी मोहा दारूचा शोध घेवून तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला. शिवाय मोठ्या प्रमाणात दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या ४ पथकांनी सेलू व हिंगणी परिसरात छापे घालून आरोपी राजन बोदलखंडे (३५) तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण १ लाख ७ हजार २८५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी काद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय इतर ठिकाणी छापा टाकून दारूगाळण्याचे साहित्य व गावठी दारू असा एकूण ४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पंकज पवार, महेंद इंगळे, अशोक साबळे, उदरसिंग बारवाल, किटे, जांभूळकर आदींनी केली.नाकेबंदी करून कारसह देशीदारू पकडलीदेवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकेबंदी करून पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारसह देशी दारू असा एकूण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यवतमाळ जिल्ह्यातून खरेदी केलेली देशी दारू कारच्या सहाय्याने देवळी मार्गे वर्धा जिल्ह्यात आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी रत्नापूर शिवारात नाकेबंदी करून ए.एच.०१ ए.ई. ५७२६ क्रमांकाची कार अडविली. पोलिसांनी कारचालक सिद्धार्थ जेटीथोर आणि हर्षल राजू खोपाल रा. देवळी याला ताब्यात घेवून कारची बारकाईने पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे.या कारवाईत पोलिसांनी देशी दारूच्या एकूण २० पेट्या व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ), ८३ सह. कलम १३०/१७७ मो.वा.का. अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे याच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निदेर्शानुसार पोलीस हवालदार निरंजन वरभे, ना.पो.शि. कुलदीप टांकसाळे, पो.शि. राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे, विकास अवचट आदींनी केली. पुढील तपास सुरू आहे.जिल्ह्यात कुठेही दारूची विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी