आनंदनगर, पुलफैलभागात वॉशआऊट मोहीम
By Admin | Updated: June 19, 2015 00:17 IST2015-06-19T00:17:12+5:302015-06-19T00:17:12+5:30
जिल्ह्यातील दारूबंदी कडक करण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

आनंदनगर, पुलफैलभागात वॉशआऊट मोहीम
२.४० लाख रुपयांचा दारूसाठा केला नष्ट
वर्धा : जिल्ह्यातील दारूबंदी कडक करण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात गावठी दारू गाळण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात पोलिसांच्यावतीने ‘वॉश आऊट’ या नावाने मोहीम राबविण्यात येत आहे. यात गुरुवारी पहाटे आनंदनगर व पुलफैल परिसरात कारवाईत करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे.
यात प्लास्टिकसह लोखंडी ड्रममधील गावठी दारूसाठा व साहित्य जप्त नष्ट करण्यात आले. दारूभट्टी चालविणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला. गत महिन्यापासून अशी मोहीम सुरू असताना दारूच्या भट्ट्या नष्ट होताना दिसत नाही.(प्रतिनिधी)
कारसह दीड लाखांचा दारूसाठा जप्त
समुद्रपूर - चोरीचे आरोपी घेवून नागपूर वरून परत येत असताना ठाणेदार अनिल जिट्टावर यांना एका कारवर संशय आला. तिची तपासणी केली असता कारमध्ये ७ पेट्या देशी दारूच्या आढळून आल्याने कारसह १ लाख ८१ हजारांचा माल जप्त केला. ही कारवाई शेडगाव नजीक करण्यात आली. यात सिदंी रेल्वे येथील प्रशांत सुरेश गवळी (२४) व राहुल गजानन लष्करे (२२) या दोघांना अटक करण्यात आली आहे.