धो-धो पावसासह विजांची आतषबाजी
By Admin | Updated: September 18, 2016 00:50 IST2016-09-18T00:50:16+5:302016-09-18T00:50:16+5:30
विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या मुसळधार पावसाने वर्धेकरांना चांगलेच झोडपले. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास

धो-धो पावसासह विजांची आतषबाजी
पाऊण तास झोडपले : वीज पडून नुकसानीची भीती
वर्धा : विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या मुसळधार पावसाने वर्धेकरांना चांगलेच झोडपले. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाची धोधो ८.२० वाजता थांबली. सुमारे तीन विजा शहरात पडल्या असाव्यात, या पद्धतीने आकाशात लख्ख प्रकाश पडून कडकडाट झाला.
७ वाजताच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला. पावसाचे कुठेलिही संकेत नसताना टपोरे थेंब पडू लागले. काहीवेळातच धो-धो पावसाला सुरुवात झाली. घराबाहेर पडलेल्या नागरिकांना जागा मिळेल तिथेच थांबावे लागले. अशातच पावसासह सतत विजांचा कडकडाट होत होता. या विजा नक्कीच कुठेतरी पडल्या असाव्यात, असा अंदाज आहे. वृत्तलिहेपर्यंत याबाबत काहीही कळू शकले नाही.(जिल्हा प्रतिनिधी)