शिवणी पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:21 IST2018-02-08T22:21:38+5:302018-02-08T22:21:50+5:30
तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी येथे धाड घालत कारवाई केली.

शिवणी पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी येथे धाड घालत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही मोहीम गुरुवारी राबविण्यात आली.
वॉश आऊट मोहिमेंतर्गत नदी व नाल्यामध्ये लवपून ठेवलेला मोहा सडवा आणि दारूसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी प्लास्टिकच्या एकूण ४४ ड्रम मधील ४४०० लिटर मोहा सडवा, २३ लोखंडी मोठ्या ड्रममध्ये ४,६०० लिटर सडवा असा एकूण ९००० लिटर मोहा सडवा व १२ कॅनमधून ३६० लीटर मोहा दारू असा एकूण ५ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा दारू सडवा मोहिमेंतर्गत नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात अजय अवचट, श्रीकांत कडू, राहुल गिरडे, यशवंत गोल्हर, संजय सूर्यवंशी यांनी ही कार्यवाही केली.