वर्धा जिल्ह्यातील शीख बेड्यावर ‘वॉश आऊट’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:19 IST2018-04-10T16:18:59+5:302018-04-10T16:19:10+5:30
बोरगाव (मेघे) भागातील शीख बेड्यावर सावंगी पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली.

वर्धा जिल्ह्यातील शीख बेड्यावर ‘वॉश आऊट’ मोहीम
ठळक मुद्देसहा दारूविक्रेत्यांना अटकगावठी दारूसह २.३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बोरगाव (मेघे) भागातील शीख बेड्यावर सावंगी पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी सहा दारूविक्रेत्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गावठी दारूसह २ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, राऊत, प्रदीप बिसने, स्वप्नील मोटे, संघसेन कांबळे, विकास अवचट यांनी केली.