शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वर्धेकरांनो सावधान, ...आव्हान सायबर गुन्हेगारीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

इंटरनेटच्या वापराने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञानामुळे ते तितकेच धोकादायक देखील बनले आहेत. त्यामुळे सायबर साक्षरता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. कोणत्या मोड्स ऑपरेंडीला सर्वसामान्य संमोहित होऊन फसले जातात. ते टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्याव, यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वाचकांसाठी केलेला हा विशेष वृत्तांत... 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या युगात इंटरनेट हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेटच्या वापराने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञानामुळे ते तितकेच धोकादायक देखील बनले आहेत. त्यामुळे सायबर साक्षरता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. कोणत्या मोड्स ऑपरेंडीला सर्वसामान्य संमोहित होऊन फसले जातात. ते टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्याव, यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वाचकांसाठी केलेला हा विशेष वृत्तांत... सायबर गुन्हे हे असे गुन्हे आहेत ज्यात संगणक, इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक पातळीवर किंवा संस्था विरोधात कृत्य केले जाते. हे गुन्हे करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट, ई मेल, चॅटरूम, पायरेटेड सॉफ्टवेअर, वेबसाईट आदी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. तरुण मुले व महिला सायबर चोरट्यांच्या भूलथापांना लगेच बळी पडतात.

लॉटरीचे प्रलोभन...

लॉटरी लागल्याचे प्रलोभन देऊन सायबर चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले आहे. त्यामुळे लॉटरीची ऑफर प्राप्त झाल्यास सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे. आतापर्यंत २५ वर नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. 

सायबर गुन्ह्यांचे महत्त्वाचे प्रकार नोकरीचे आमिष; १० जणांना गंडा -   वाढत्या बेरोजगारीमुळे सायबर चोरट्यांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. यात तरुणांना निवड झाल्याची खोटी यादी पाठविली जते. त्यानंतर तत्काळ नियुक्ती करण्यासाठी पैशाची मागणी करीत खोटी आश्वासने दिली जातात. त्यामुळे अज्ञातांकडून नोकरीची ऑफर मिळाल्यास प्रथम त्याची सतत्यता तपासावी.

फिशिंग; १५ जण जाळ्यात -   अलीकडच्या काळात सर्वाधिक वापर वापरला जाणार हा प्रकार आहे. यात नागरिकांचे बॅंक डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मूळ संकेतस्थळासारखे दिसणारे बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांची गोपनीय माहिती चोरली जाते. ई-मेल किंवा फोन करून बनावट वेब लिंक पाठवून माहिती घेऊन फसवणूक होते. अशा १५ जणांची लाखोंनी फसवणूक झाल्याची नोंद आहे.

लग्नाच्या आमिषाने फसवणूकविवाह जुळणाऱ्या संकेतस्थळावर  आकर्षक प्राेफाईल बनवून ठेवल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वैयक्तिक फोटो शेअर केल्याने तरुणींच्या फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

‘आयडेंटी थेफ्ट’-   इंटरनेटचा वापर करताना आपल्या ओळखपत्राची माहिती अनोळखी माणसांना किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करु नका. -   सायबर चोरटे आपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे इतरांना आपण आहोत, असे भासवून त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने संवाद साधू शकतात. लकी ड्राॅ सारखे कुपन किंवा कोणताही फॉर्म भरताना याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

सायबर चोरट्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती केली आहे. मात्र, तरीही नागरिक पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी चोरट्यांचे फावते. इंटरनेटचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेतल्यास गुन्हे रोखणे शक्य होऊ शकते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.- महेंद्र इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सायबर सेल.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम