वर्धेच्या नाट्यगृहाचा मुद्दा पोहोचला विधानसभेत

By Admin | Updated: August 3, 2016 01:06 IST2016-08-03T01:06:01+5:302016-08-03T01:06:01+5:30

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला एकही सांस्कृतिक सभागृह नसल्याने जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासाला आळा बसला आहे.

Wardha's playroom issue reached the Legislative Assembly | वर्धेच्या नाट्यगृहाचा मुद्दा पोहोचला विधानसभेत

वर्धेच्या नाट्यगृहाचा मुद्दा पोहोचला विधानसभेत

लक्षवेधी : पंकज भोयर यांनी वेधले लक्ष
वर्धा : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला एकही सांस्कृतिक सभागृह नसल्याने जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासाला आळा बसला आहे. जिल्ह्यात सांस्कृतिक सभागृह मिळावे याकरिता वित्तमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २४.९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. याला चार महिन्यांचा कालावधी होत असला तरी यावर कुठलीही कारर्यवाही झाली नसल्याने विधानसभेत आ. डॉ. पंकज भोयर यांनी लक्ष वेधले.
वर्धा जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता सद्य:स्थितीत एकाही नाट्यगृह उपलब्ध नाही. यामुळे वर्धा शहरात १००० ते १५०० आसन क्षमतेचे बंदीस्त नाट्यगृह व्हावे, अशी जिल्ह्यातील जनतेची कित्येक दिवसांपासून मागणी आहे. याकरिता पाठपुरावा करून वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी २० कोटी रुपयांची तरतूद केली. या तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नाट्यगृहाचा प्रस्ताव पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे सादर केला. यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे नाट्यगृहाच्या अंदाजपत्रक व आराखड्यासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २४.९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. याला आज तीन महिन्याांच कालावधी झाला आहे. असे असताना शासनस्तरावर अद्यापही नाट्यगृहाच्या कामाला मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे शासनाने याकडे लक्ष देत नाट्यगृहाची मागणी पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी आ. डॉ. भोयर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Wardha's playroom issue reached the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.