वर्धेच्या नृत्यकलावंताचे पुण्यात वर्चस्व

By Admin | Updated: June 9, 2014 23:46 IST2014-06-09T23:46:47+5:302014-06-09T23:46:47+5:30

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे द्वारे ऑल इंडिया मल्टी-अँग्युअल ड्रामा, डान्स, म्यूझिक कॉन्टेस्ट/फेस्ट पुणेचे आयोजन करण्यात आले होते. येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्धेतील वेदिका डान्स अँकेडमीने

Wardha's choreographer dominates in Pune | वर्धेच्या नृत्यकलावंताचे पुण्यात वर्चस्व

वर्धेच्या नृत्यकलावंताचे पुण्यात वर्चस्व

वर्धा : अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे द्वारे ऑल इंडिया मल्टी-अँग्युअल ड्रामा, डान्स, म्यूझिक कॉन्टेस्ट/फेस्ट पुणेचे आयोजन करण्यात आले होते. येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्धेतील वेदिका डान्स अँकेडमीने तिसर्‍यांदा वर्चस्व गाजविले.
या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेने भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय युवा स्पर्धा म्हणून रेकॉर्ड बनविला  आहे. या स्पर्धेला विविध राज्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील परिपूर्ण अनुभवी आणि दिग्गज परीक्षकांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वेदिका डान्स अँकेडमीच्या सिनिअर-ज्यूनिअर ग्रुपला फोक स्टाईलमध्ये चेअरमन अवॉर्ड मिळाले. सिनिअर ग्रुपमध्ये वेदिका फटींगे, पंकज थूल, ऋषी पिंपळे, निर्मिती गावंडे, इशा कोठारकर, समीक्षा तपासे यांचा समावेश होता. ज्युनिअर ग्रुपमध्ये सायली देवगिरकर, अनुष्का देवगिरकर, वैदेही आरभी, आदिती काटे यांचा सहभाग होता. त्याचबरोबर मॉडर्न स्टाईलमध्ये  वेदिका फटिंगे हिला सिनिअर सोलो मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच याच स्टाईलमध्ये पंकज थूल याला चेअरमन अवॉर्ड प्राप्त झाला.
ज्यूनिअर गटात फोक स्टाईलमध्ये सोलो कॅटेगरीत, सायली देवगिरकर, निर्मिती गावंडे व ड्यूएटमध्ये वैदेही आरभी व वैदेही पिंगळे यांना तसेच मॉडर्न स्टाईलमध्ये सोलो कॅटेगरीत  इशा कोठारकर हिला द्वितीय व अनुष्का देवगिरकर, आदिती काटे, ईश्‍वरी धमाने यांना चेअरमन अवार्ड प्राप्त झाले. समीक्षा तपासे हिला सेमीक्लासिकल ज्युनिअर सोलो मध्ये व ऐश्‍वर्या दाते हिला सिनिअर सोलोमध्ये व फोक स्टाईलमध्ये चेअरमन अवार्ड मिळाला. त्याचप्रमाणे मायनर गटात सोलो मॉडर्न स्टाईलमध्ये पावणी इंगोले व फोक स्टाईलमध्ये दामिनी सुर्यवंशी यांना चेअरमन अवॉर्ड प्राप्त झाला. या नृत्य स्पर्धेत विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अहे घवघवीत यश मिळविण्याची वर्धेची तिसरी वेळ असल्याने वर्धेचा वरचश्मा सर्वत्र पहावयास मिळाला.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Wardha's choreographer dominates in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.