शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

वर्धेकरांना नीलपंखच्या शिल्पाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 22:08 IST

वर्षभरापूर्वी याच दिवशी २२ आॅगस्ट रोजी वर्ध्याच्या शहरपक्षी म्हणून भारतीय नीलपंख पक्ष्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. या शहर पक्ष्यांची निवड बहुसंख्य वर्धेकरांनी मतदान प्रक्रियेव्दारे केली असल्यामुळे नीलपंख पक्ष्याचे आकर्षक शिल्प शहरातील धुनिवाले चौकात स्थापित करण्याची मागणी बहार नेचर तर्फे करण्यात आली होती.

ठळक मुद्देआज शहरपक्षी दिन : मतदान प्रक्रि येद्वारे निवडला पक्षी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्षभरापूर्वी याच दिवशी २२ आॅगस्ट रोजी वर्ध्याच्या शहरपक्षी म्हणून भारतीय नीलपंख पक्ष्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. या शहर पक्ष्यांची निवड बहुसंख्य वर्धेकरांनी मतदान प्रक्रियेव्दारे केली असल्यामुळे नीलपंख पक्ष्याचे आकर्षक शिल्प शहरातील धुनिवाले चौकात स्थापित करण्याची मागणी बहार नेचर तर्फे करण्यात आली होती. नगर परिषदेने या मागणीला मंजुरीही दिली होती, मात्र वर्षभरानंतरही ही मागणी अद्याप प्रलंबित आहे.शहरपक्षी निवडण्याकरिता वर्धा नगर परिषद आणि बहार नेचर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून ते १५ आॅगस्ट २०१८ या काळात शहरपक्षी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तांबट, धीवर, नीलपंख, कापशी घार व पिंगळे हे पाच पक्षी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. तब्बल ५४ दिवस चाललेल्या या निवडणुकीत शहरातील ५१ हजार २६७ विद्यार्थी व नागरिकांनी मतदान केले होते. २२ आॅगस्ट रोजी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात मतमोजणी करण्यात आली. २२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने वर्धेकरांनी नीलपंख या पक्ष्याला निवडून दिले होते. प्रख्यात पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी अनेक पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत या पक्षाच्या निवडीची रीतसर घोषणा केली होती. यावेळी नीलपंखचे आकर्षक शिल्प धुनिवाले चौकात स्थापित करण्याचेही जाहीर करण्यात आले होते.धुनिवाले चौकातील शिल्पात हवा बदलधुनिवाले चौकाचे सौंदर्यीकरण करून चौकात मध्यभागी एक मशाल व तीन मोरांचे शिल्प ठेवण्यात आले आहे. या शिल्परचनेत बदल करून एक मोर शिल्प कायम ठेवून राज्यपक्षी हरियाल व शहरपक्षी नीलपंख यांचा या शिल्पात समावेश करावा, अशी मागणी नालवाडी ग्रामपंचायतीकडे केली आहे.महात्मा गांधी चौक ते इंदिरा गांधी चौक या रस्त्याच्या दुतर्फा विविध पक्ष्यांची माहिती देणारे तसेच जैवविविधता दर्शविणारे फलक लावावे आणि शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर भारतीय नीलपंखाचा समावेश करावा.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विस्तारीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरु असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात आता नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारावे, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.