वर्धेत सभापतिपदे सत्ताधाऱ्यांकडेच
By Admin | Updated: December 24, 2014 23:03 IST2014-12-24T23:03:51+5:302014-12-24T23:03:51+5:30
येथील नगरपालिकेच्या विषय समिती सभापतिपदी तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस- गुलशन आघाडीच्या सदस्यांतूनच करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय

वर्धेत सभापतिपदे सत्ताधाऱ्यांकडेच
वर्धा: येथील नगरपालिकेच्या विषय समिती सभापतिपदी तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस- गुलशन आघाडीच्या सदस्यांतूनच करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर होते.
अर्थ नियोजन समितीच्या सभापतिपदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी सुनील महंतारे यांची, शिक्षण समितीच्या सभापतिपदी डॉ. सिद्धार्थ बुटले, बांधकाम समितीच्या सभापतिपदी राखी पांडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सुमित्रा कोपरे, आरोग्य समितीच्या सभापतिपदी शांता जग्यासी यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या उपसभापतिपदी शुभांगी कोलते यांची निवड झाली, तर स्थायी समितीच्या सदस्यपदी प्रशांत बुर्ले, संतोषसिंग ठाकूर, प्रफुल्ल शर्मा यांची निवड करण्यात आली.(प्रतिनिधी)