शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच.. प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 18:26 IST

पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते ते बघतोच, अशी धमकी देऊन ते वारंवार पैशाची मागणी करायचे.

ठळक मुद्देआईची सावंगी पोलिसांत तक्रार : दोघांविरुद्ध गुन्हा केला दाखल

वर्धाप्रेयसीच्या सततच्या धमकीने धास्तावलेल्या प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच, तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन... अशी धमकी प्रेयसीकडून व तिच्या सहकाऱ्याकडून मिळत होती. या सततच्या जाचाला कंटाळून आशिष नरेश भोपळे, रा. विरुळ आकाजी याने मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

मृत आशिष भोपळे आणि आरोपी पारबता कुंभेकर, रा. कृष्णापूर, ता. आर्वी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते मी बघतो, अशी धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी करायचे. त्यांनी आशिषला तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे देण्यास नकार दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवे ठार मारून तुला पोलीस केसमध्ये फसवीन, अशी धमकी देऊ लागले.

प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळे याने मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविले. त्याच्याजवळील चिठ्ठीत त्याने हे सर्व नमूद केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आल्याने मृत आशिषची आई सुनंदा भोपळे यांनी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पारबता कुंभेकर आणि तिलक साटोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूwardha-acवर्धा