वर्धा पोलिसांची वॉश-आऊट मोहीम

By Admin | Updated: September 25, 2015 02:43 IST2015-09-25T02:43:45+5:302015-09-25T02:43:45+5:30

पोलिसांनी आनंदनगर व पुलफैल परिसरात केलेल्या विविध कारवाईत ३ लाख ९६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी वर्धा पोलीस पथकाने विविध ठिकाणी छापे मारुन ही कारवाई केली.

Wardha police's wash-out campaign | वर्धा पोलिसांची वॉश-आऊट मोहीम

वर्धा पोलिसांची वॉश-आऊट मोहीम

वर्धा : पोलिसांनी आनंदनगर व पुलफैल परिसरात केलेल्या विविध कारवाईत ३ लाख ९६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी वर्धा पोलीस पथकाने विविध ठिकाणी छापे मारुन ही कारवाई केली.
या कारवाईत मोहा, सडवा, रसायन तसेच प्लास्टिक व लोखंडी ड्रममध्ये ठवेलेला गावठी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्यात आला. दारूभट्टीवर केलेल्या कारवाईत जळाऊ सरपण, टिनाचे पत्रे, विटा व भट्टीचे इतर साहित्य असे ५ हजार रूपयाचे साहित्य जप्त केले. आनंदनगर व पुलफैल परिसरातील कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
देवळी येथे नाकाबंदी करून कारवाई
देवळी - येथील टी-पॉर्इंटवर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत दुचाकी चालकासह विदेशी दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. या प्रकरणी राहुल विरूळकर रा. म्हसाळा, वर्धा याला पोलिसांनी अटक केली. प्राप्त माहितीनुसार, राहुल हा दुचाकीने विदेशी दारूच्या १८० मिलीच्या बाटली घेवून जात असताना पोलिसांनी नाकाबंदी करून त्याचे वाहन तपासले. यावेळी दारूच्या बाटली आढळल्या. या कारवाईत वाहनासह ५९ हजार ६०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवळी पोलिसांनी मुदाका कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Wardha police's wash-out campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.