शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुरूष गटात नागपूर रेंज तर महिलांत वर्धा पोलिसांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:57 PM

येथील जागृती क्रीडा मंडळाच्यावतीने आमदार डॉ. शरद काळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेच्या पुरूष गटात प्रथम पारितोषिक नागपूर रेंज पोलिसांच्या चमूने तर महिला गटाचे प्रथम पारितोषिक वर्धा पोलीस चमूने पटकावले.

ठळक मुद्देशरद काळे स्मृती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

ऑनलाईन लोकमतआर्वी : येथील जागृती क्रीडा मंडळाच्यावतीने आमदार डॉ. शरद काळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेच्या पुरूष गटात प्रथम पारितोषिक नागपूर रेंज पोलिसांच्या चमूने तर महिला गटाचे प्रथम पारितोषिक वर्धा पोलीस चमूने पटकावले. राजीव गांधी स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेचा समारोप रविवारी झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अमर काळे हे होते, तर महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे, रिसोडचे आ. अमित झणक, वर्धा जिल्हा अ‍ॅम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष नागोराव लोडे, माजी नगरसेवक प्रा. पंकज वाघमारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, जि.प. सदस्य मुकेश कराळे, अरूण बाजारे, संगीता खेकाडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.यावेळी माणिकराव ठाकरे यांनी मैदानी खेळाच्या स्पर्धेच्या आयोजनातून समाजात खेळभावना तर वाढतेच शिवाय देशी खेळाची आवड सुद्धा निर्माण होते, असे सांगून स्व. आमदार डॉ. शरद काळे यांची आठवण करून स्मृती जागृत केल्या. स्पर्धेच्या आयोजनातील सातत्य कायम ठेवण्याचे खेळाचे महत्त्व विषद केले. आ. अमर काळे यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या व स्पर्धेला प्रतिसाद देवून उत्साह वाढविणाºया प्रेक्षकांच व सहकार्य करणाºयांचे आभार मानले.या स्पर्धेच्या पुरूष गटात २० चमुंनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर नागपूर येथील एकलव्य क्रीडा मंडळाच्या उपविजेत्या चमूला द्वितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर महिला गटात सहा चमूंनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या ठरलेल्या वर्धा पोलीस चमूला प्रथम पारितोषिक तर उपविजेत्या ठरलेल्या नागपूर सिटी पोलीस चमूला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.स्व. आमदार डॉ. शरदराव काळे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, बुलढाणा येथील विधानसभा सदस्य हर्षवर्धन सपकाळ, सोलापुरच्या विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते.

टॅग्स :Amar Kaleअमर काळे