वर्धा न.प.चा ८७ कोटींचा अर्थसंकल्प

By Admin | Updated: March 3, 2016 02:13 IST2016-03-03T02:13:40+5:302016-03-03T02:13:40+5:30

विकासाच्या कामात मागे पडलेल्या वर्धा नगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर झाल्याचे दिसून येते.

Wardha NP's budget of 87 crores | वर्धा न.प.चा ८७ कोटींचा अर्थसंकल्प

वर्धा न.प.चा ८७ कोटींचा अर्थसंकल्प

२६ लाख शिल्लक राहणार असल्याचा अंदाज
वर्धा : विकासाच्या कामात मागे पडलेल्या वर्धा नगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर झाल्याचे दिसून येते. ८७ कोटी २५ लाख रूपयांचे हे अंदाजपत्रक असून यामध्ये खर्च जाता २६ लाख रूपये शिल्लक राहणार आहे.
पालिकेच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात २९ फेबु्रवारी २०१६ रोजी वर्धा नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी नगर परिषदेचा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षांचा अनुमानित अर्थसंकल्प सादर केला. लेखापाल अशोक वाघ यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. प्रस्तावित बजेटमध्ये ८७.२७ कोटी रूपये खर्च होणार असून अंतिम शिल्लक २६ लाख राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
बजेटसंदर्भात न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी सविस्तर माहिती दिली. नगरोत्थान योजनेंतर्गत विकासाची कामे करण्याच्या दृष्टीने प्रत्येक नगरसेवकांचे ५ लाख रुपयेप्रमाणे ४३ वॉर्डातील कामासाठी २ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेचे विविध उत्पन्नाचे स्त्रोत व शासनाच्या प्राप्त अनुदानानुसार एकंदर ४१.३७ कोटी रुपये प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
तसेच अपंग कल्याणाकरिता, मागासवर्गीय, दलित, अनुसूचित जातीसाठी घरकुल बांधकामसाठी तरतूद करण्यात आली आहे. अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा, भुयारी गटारे, आणि उद्यान विकासाच्या कामासाठी वर्धा न.प.ल एकंदर ३५.३० कोटींचा निधी मंजूर केला आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Wardha NP's budget of 87 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.