डेंग्यूच्या अप्रत्यक्ष रक्त संकलनात वर्धा माघारला

By Admin | Updated: August 1, 2016 15:54 IST2016-08-01T15:54:14+5:302016-08-01T15:54:14+5:30

आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यूच्या रुग्णाचा शोध घेण्याकरिता आवश्यक असलेल्या दोन संकलन पद्धतीपैकी अप्रत्यक्षरित्या रक्त संकलनात जिल्हा माघारला आहे

Wardha Magharla in the indirect blood collection of dengue | डेंग्यूच्या अप्रत्यक्ष रक्त संकलनात वर्धा माघारला

डेंग्यूच्या अप्रत्यक्ष रक्त संकलनात वर्धा माघारला

>रूपेश खैरी / ऑनलाइन लोकमत - 
चार महिन्यांत केवळ २५ रक्तनमुने तपासणीकरिता 
वर्धेलगतच्या दयाल नगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण 
प्रत्यक्ष रक्त संकलास जिल्ह्यात नव्याने प्रारंभ 
वर्धा, दि. 01 -  प्रत्यक्ष ठराविक औषधोपचार नसलेल्या डेंग्यूवर केवळ जनजागृती हाच एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. असे असताना याच विभागाकडून डेंग्यूच्या रुग्णाचा शोध घेण्याकरिता आवश्यक असलेल्या दोन संकलन पद्धतीपैकी अप्रत्यक्षरित्या रक्त संकलनात जिल्हा माघारला आहे. या प्रकारातून होत असलेले रक्तसंकलन सरासरी कमी होत आहे. 
 
डेंग्यूवर आळा बसविण्याकरिता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक महिन्याला बाह्य रुग्ण विभागातील तापाच्या रुग्णसंख्येच्या १५ टक्के रक्तनमुन्यांचे संकलन होणे आवश्यक आहे. सध्याच्या वातावरणात व्हायरल फिव्हरचा जोर असताना जिल्ह्यातून गत चार महिन्यात केवळ २५ रक्तनमुनेच पाठविण्यात आले आहे. यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.  हा रुग्ण शहरी भागातील असल्याचे समोर आले आहे. याबाबीला वर्धा शहरातील अस्वच्छता कारणीभूत असल्याचे बोलले जाते आहे. 
 
वाढत्या डेंग्यूच्या आजारावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावीने दोन पद्धतीने रक्तसंकलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या पद्धती अंमलात आहेत. त्यापैकी आरोग्य सेवकांच्यावतीने प्रत्यक्ष संकलन पद्धतीचा वापर होत असून रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांच्या रक्तनमुन्यांकडे मात्र कर्मचाºयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोग्य विभागाच्यावीतने सांगण्यात आले आहे. 
 
शालेय जनजागृतीला प्रारंभ
डेंग्यूच्या आजारावर आळा मिळविण्याकरिता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून सोमवारपासून शालेय डेग्यू जनजागृती अभियानाला प्रारंभ झाला आहे. १५ दिवस चालणाºया या अभियानातून विद्यार्थ्यांत या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यात येणार असल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात आले आहे. 
 
डेंग्यू आता नोटीफाईड आजार
डेंग्यूची नोंद अधिसूचित आजारांच्या यादीत केली आहे. यापुढे सरकारी रुग्णालयासह खासगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने तसे आदेशही जारी केला आहे. सन २०१२ मध्ये जिल्ह्यासह सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली होती. आतापर्यंत या आजाराबाबत ३६ हजारांपर्यंत नोंद आरोग्य विभागाकडे आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णाचा नोटीफाईड यादीत समावेश करण्याची मागणी पुढे आली होती. मुंबई येथील हेल्प फाऊंडेशनतर्फे यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.  
 
राज्यात तातडीने डेंग्यू रुग्णांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले होते. सरकारी आरोग्य यंत्रणेने डेंग्यूच्या नोंदी घेतल्या होत्या; मात्र खासगी रुग्णालयावर यासंदर्भात कोणतीही बंधने नव्हती. परंतु केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने डेंग्यूच्या अधिसूचना दिल्या गेल्या आहे. त्यामुळे सार्वजनिक, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार करणाºया डॉक्टरांनी डेंग्यू रुग्णाची नोंद घ्यावी लागणार आहे. रुग्णांची आकडेवारी महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाकडे तर ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाºयाकडे डेंग्यू रुग्णाची नोंद करावी लागेल.
 
तीन वर्षांत १८ जणांचा मृत्यू  
ठराविक औषधोपचार नसलेल्या या आजाराने जिल्ह्यात गत तीन वर्षांत एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सन २०१३ मध्ये वर्धेत १३५ रुग्ण आढळले होते. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. सन २०१४ मध्ये ३४६ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. सन २०१५ मध्ये ४१ रुग्णांची नोंद झाली असून यापैकी एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
आरोग्य विभागाच्यावतीने दोन्ही प्रकारातील संकलन सुरू आहे. मात्र अप्रत्यक्ष रक्त संकलनात जिल्हा माघारात असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आल्या आहेत. तो वाढविण्यावर आरोग्य विभागाचा कल आहे.
- डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा
 

Web Title: Wardha Magharla in the indirect blood collection of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.