शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Wardha Lok Sabha Results 2024 : किरसान हे सरासरी १८ हजार ५२४ मतांनी आघाडीवर

By रवींद्र चांदेकर | Updated: June 4, 2024 13:10 IST

Wardha Lok Sabha Results 2024 : प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना आतापर्यंत ७७ हजार ३१ मते

Wardha Lok Sabha Results 2024  : वर्धा लोकसभा मतदारसंघात चार फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे ९ हजार ४१३ मतांनी आघाडीवर आहे. चार फेऱ्यांअंती त्यांना एकूण ८६ हजार ४४४, तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना ७७ हजार ३१ मते मिळाली.

पहिल्या फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी १८ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अमर काळे यांनी ती १८ मते भरून काढत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत काळे यांना १९ हजार ५६५, तर तडस यांना १९ हजार ५८३ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत काळे यांना २१ हजार ९९९, तर तडस यांना १६ हजार ७३१ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत काळे यांना २४ हजार ८२०, तर तडस यांना २१ हजार ३१ मते मिळाली आहे. चौथ्या फेरीत काळे यांना २० हजार ६०, तर तडस यांना १९ हजार ६८६ मिळाली आहे. बसपाचे मोहन राईकवार तीन हजार ५३० मते घेत तिसऱ्या, तर अपक्ष आसीफ तीन हजार ५७ मते घेत चौथ्या क्रमांकावर आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून या सहाही मतदारसंघातून तब्बल २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये भाजपाचे रामदास तडस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. राजेंद्र सोळंखे, बहुजन समाज पार्टीचे डॉ. मोहन राईकवार यांच्यासह १३ पक्षाचे तर ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ही निवडणूक भाजपा विरुद्ध शरद पवार गट यांच्यातच राहिली. २६ एप्रिलला मतदानात ६४.८५ टक्क्यांचा टप्पा गाठला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३.६७ धामणगाव टक्क्यांनी मतदान वाढले आहे.                              

सन २०१९ च्या निवडणुकीतही भाजपाकडून खासदार रामदास तडस रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अॅड. चारुलता ठोकस यांनीही लोकसभेच्या मैदानात आपले भविष्य आजमावले होते. अॅड. चारुलता टोकस यांची मतदारसंघात असणारी अनुपस्थिती तसेच केंद्रातील भाजप सरकारची विकासकामे लक्षात घेऊन मतदारांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या बाजूने कौल दिला होता. रामदास तडस हे १ लाख ८९ हजार मतांनी विजयी झाले होते. रामदास तडस हे २०१४ पासून सलग दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असून आता पुन्हा तिसऱ्यांदा ते खासदारकीसाठी रिंगणात आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धाMaharashtraमहाराष्ट्र