वर्धा जिल्ह्यात बिबट्याने घेतला दोन वासरांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:05 IST2020-02-06T13:04:49+5:302020-02-06T13:05:11+5:30

घोराड तालुक्यातील मौजा जखाळा शिवारात बुधवारी रात्री शेतात बांधून ठेवलेल्या दोन वासरांचा बिबट्याने बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

In wardha district, two cows were killed by leopard | वर्धा जिल्ह्यात बिबट्याने घेतला दोन वासरांचा बळी

वर्धा जिल्ह्यात बिबट्याने घेतला दोन वासरांचा बळी

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: घोराड तालुक्यातील मौजा जखाळा शिवारात बुधवारी रात्री शेतात बांधून ठेवलेल्या दोन वासरांचा बिबट्याने बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
येथील शेतकरी सुरेश रामदास माहुरे यांचे जखाळा शिवारात शेत आहे. या शेतातच असलेल्या गोठ्यात ते आपली जनावरे बांधतात. गुरुवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना गोठ्यात गायीचे एक वासरू मृतावस्थेत आढळले. दुसऱ्या वासराचा शोध घेत ते निघाले असता त्यांना काही अंतरावर रक्ताचे डाग आढळून आले. यावरून रात्री बिबट्याने या वासरांचा बळी घेतला असावा असा कयास व्यक्त केला जातो आहे. दुसरे वासरू बिबट्याने जंगलात नेले असावे असाही तर्क काढला जातो आहे. या प्रकारामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. तसेच माहुरे कुटुंबाचे सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले आहे.

Web Title: In wardha district, two cows were killed by leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.