शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'हर घर नल से जल'मध्ये वर्धा जिल्हा ठरला नागपूर विभागातून अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:59 IST

९८.२५ टक्के जोडणी झाली पूर्ण : जिल्ह्याची कामगिरी ठरली सरस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठरविण्यात आलेल्या 'हर घर नल से जल' उद्दिष्टानुसार वर्ष २०२४-२५ अंतर्गत वर्धा जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ९४२ कुटुंबांपैकी २ लाख ३४ हजार ७५४ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे काम ९८.२५ टक्के पूर्ण झाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार गाव, जिल्हा व राज्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. यानुसार नियोजित घरगुती नळ जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन करण्यात येते. यासाठी गाव कृती आरखडा तयार करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत घेण्यात येते. वर्धा विभागातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करीत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेत माहिती घेतात व सूचना करतात. 

१,९८९ नळ जोडणी प्रगतीपथावरजलजीवन मिशनअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. अशा योजनांची सुधारात्मक पुनर्जोडणी करून कार्यात्मक घरगुती नळ जोडणी दिली जाते. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुनर्जोडणी योजनांचा समावेश करण्यात येतो. जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर नल से जल' लक्षाप्रमाणे वर्धा विभागाने उत्तम कामगिरी करत ९८.२५ टक्के कुटुंबांना नळ जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १ हजार ९८९ नळ जोडणी प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना