कर्जमाफीच्या यादीतून वर्धा जिल्हा गायब
By Admin | Updated: July 5, 2017 04:17 IST2017-07-05T04:17:09+5:302017-07-05T04:17:09+5:30
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वटरवरून जाहीर केली खरी, परंतु यामध्ये वर्धा जिल्ह्याचे

कर्जमाफीच्या यादीतून वर्धा जिल्हा गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वटरवरून जाहीर केली खरी, परंतु यामध्ये वर्धा जिल्ह्याचे नावच नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातून थकबाकी असलेल्या एकूण ९७ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांसह जिल्हा उपनिबंधक सांगत आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वटरवर असलेल्या यादीत वर्धेतील एकही शेतकरी कसा दिसत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
शासनाच्या सूचना येताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी तयार करून तशी माहिती शासनाला पाठविली आहे. मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्व्टरवर काय माहिती टाकली याबाबत कल्पना नाही.