लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. मांडगाव येथे झालेल्या या विवाहाच्या वेळी वराकडून २ तर वधूकडून ३ जण उपस्थित होते. या विवाहाला स्थानिक पोलीस पाटलांचीही उपस्थिती होती.बोथुडा या गावातील आकाश घनश्याम किरपाल व मांडगाव येथील विद्या हरिदास तडस हे दोघेही परस्परांना हार घालून विवाह बंधनात अडकले. यावेळी गावकरी वा अन्य नातेवाईक उपस्थित नव्हते. पोलिस पाटलांनी वरवधूला आशीर्वाद दिले.
वर्धा जिल्ह्यात पाच कुटुंबियांसह पोलिस पाटलांच्या साक्षीने झाला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 09:46 IST