‘वर्धा बंद’ संमिश्र

By Admin | Updated: November 10, 2014 22:47 IST2014-11-10T22:47:47+5:302014-11-10T22:47:47+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमटायगर सेनेच्यावतीने सोमवारी (दि़१०) वर्धा बंदचे आवाहन करण्यात आले होते़ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़

'Wardha off' composite | ‘वर्धा बंद’ संमिश्र

‘वर्धा बंद’ संमिश्र

‘त्या’ घटनेचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
वर्धा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमटायगर सेनेच्यावतीने सोमवारी (दि़१०) वर्धा बंदचे आवाहन करण्यात आले होते़ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ सकाळपासून शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने बंद होती़ दुपारी भीम टायगर सेनेच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले़
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील एका दलित कुटुंबातील तिघांची अमानूष हत्या करण्यात आली़ या प्रकरणातील मारेकरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही़ पूरोगामी महाराष्ट्रात जातीवादातून घडलेले हे हत्याकांड लाजीरवाणी बाब आहे़ यामुळे यातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी भीमटायगर सेनेच्यावतीने सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली़ शहरातील बजाज चौकातून भीम टायगर सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला़ शहर प्रमुख विशाल रामटेके व अतुल दिवे यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली़ मोर्चामध्ये तालुका संघटक नितीन कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कोरडे, शहर प्रमुख विकास झंझाळ, सलमान खान, आशिष सोनटक्के, धम्मा सेलकर, समाधान पाटील, चुन्ना साळवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले होते़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Wardha off' composite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.