वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत अंतर्भाव करावा
By Admin | Updated: October 27, 2014 22:43 IST2014-10-27T22:43:14+5:302014-10-27T22:43:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे.

वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत अंतर्भाव करावा
निवेदनातून शासनाला साकडे : सामाजिक संघटनांची मागणी
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे. या शहरांच्या यादीत वर्धा शहराचा समावेश करण्यात यावा. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास सर्वांगीण विकास होईल, अशी मागणी येथील विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदनातून केली आहे.
या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. या निवेदनानुसार, वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य होते. देशात जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून आहे. स्वातंत्र्य समरातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा येथील सेवाग्राम आश्रम साक्षी आहे. शिवाय जिल्ह्यात वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्प असल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मात्र येथील पर्यटन स्थळांचा अद्याप पुरेसा विकास झालेला नाही. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास जागतिक वारशाचे जतन करता येईल. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशभरात चारही दिशेला जाण्याकरिता येथून रेल्वेगाडी उपलब्ध आहे. शिवाय शहराच्या परिसरात असलेले शैक्षणिक संस्थाचे जाळे, अद्यावत रुग्णालय यामुळे येथे दुरवरुन लोक उपचार घ्यायला येतात. लगतच्या जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. नागपूरसह वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत समावेशाची शिष्टमंडळाने मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)