मुंबई जुगार कायद्यातील ‘दोषसिद्धी’त वर्धा शहर पोलीस स्टेशन अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:00:02+5:30

गुन्हा दाखल झाल्यावर तपास पूर्ण करून प्रत्येक प्रकरण न्यायप्रविष्ट केले जाते; पण न्यायालयात अनेक साक्षीदार फितूर होतात. त्यामुळे दोषसिद्धीच्या प्रमाणावर परिणाम होतो. गुन्हा दाखल झाल्यावर सखोल तपास पूर्ण करताना आरोपीला कठोरच शिक्षा व्हावी या हेतूने पुरावे व इतर बाजू राहावी यावर भर देत मागील काही काळात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. त्यामुळेच यंदा दोषसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याचे सांगण्यात आले.

Wardha City Police Station tops in Mumbai Gambling Act | मुंबई जुगार कायद्यातील ‘दोषसिद्धी’त वर्धा शहर पोलीस स्टेशन अव्वल

मुंबई जुगार कायद्यातील ‘दोषसिद्धी’त वर्धा शहर पोलीस स्टेशन अव्वल

Next

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जानेवारी ते नोव्हेंबरअखेरपर्यंत विविध कलमान्वये तब्बल २ हजार ४०५ प्रकरणांतील आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये ३७२ प्रकरणांचा समावेश आहे. मुजुका कलम १२ अन्वये वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तब्बल ९६ प्रकरणांत आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली असून, हे पोलीस स्टेशन यंदा दोष सिद्धीत जिल्ह्यात पहिल्या स्थानी आहे. परिणामी, वर्धा शहर पोलीस स्टेशनमधील कामकाज इतर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरत आहे. गुन्हा दाखल झाल्यावर तपास पूर्ण करून प्रत्येक प्रकरण न्यायप्रविष्ट केले जाते; पण न्यायालयात अनेक साक्षीदार फितूर होतात. त्यामुळे दोषसिद्धीच्या प्रमाणावर परिणाम होतो. गुन्हा दाखल झाल्यावर सखोल तपास पूर्ण करताना आरोपीला कठोरच शिक्षा व्हावी या हेतूने पुरावे व इतर बाजू राहावी यावर भर देत मागील काही काळात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. त्यामुळेच यंदा दोषसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याचे सांगण्यात आले.

शिक्षा ठोठावलेल्यांत सर्वाधिक भादंविच्या कलम २३८ ची प्रकरणे
-    मागील अकरा महिन्यांत विविध कलमान्वये दाखल तब्बल २ हजार ४०५ प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यात भादंविच्या कलम २८३ ची १ हजार ३४२, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ ची २८४, भादंविच्या कलम २७९ ची ३४८, मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ ची ३७२, तर भादंविच्या कलम २८५ ची ५९ प्रकरणे आहेत. एकूणच शिक्षा ठोठावलेल्यांत सर्वाधिक भारतीय दंड विधानच्या कलम २३८ ची प्रकरणे असल्याचे दिसून येते.

 

Web Title: Wardha City Police Station tops in Mumbai Gambling Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस