शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Wardha Blast; सीमावर्ती गावांच्या पुनर्वसनाचा विषय थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 14:55 IST

मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे.

ठळक मुद्दे३१ मे २०१६ च्या दुर्दैवी घटनेनंतर झाली होती मागणी

महेश सायखेडेवर्धा: पुलगाव येथील दारूगोळा भंडाराच्या कार्यक्षेत्रात डेल्टा सब डेपो मध्ये ३० मे २०१६ च्या मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर सीएडी कॅम्प परिसराला लागून असलेल्या काही गावांच्या पुनर्वसनाची मागणी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून रेटण्यात आली होती. परंतु, अद्यापही हा विषय मार्गी लागलेला नाही. सन २०१६ च्या त्या घटनेच्या दोन वर्ष लोटूनही जखमा ताज्या असताना मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे.देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख.), येसगाव, मुरदगाव व नागझरी या गावातील नागरिकांनी सुरक्षेच्या दुष्टीने आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे रेटली होती. पुलगावयेथील दारूगोळा भंडार प्रशासन त्यांच्या हद्दीत याच गावांच्या शेजारी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करीत असल्याने ही मागणी मे २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत या मागणीवर पाहिजे तसा विचार होऊन कुठलीही प्रक्रिया न झाल्याने ही मागणी थंडबस्त्यात पडली आहे. विशेष म्हणजे त्या वेळी झालेल्या भीषण स्फोटात याच गावांमधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.१९ जणांचे बलिदानसन २०१६ मध्ये झालेल्या स्फोटात आगीवर नियंत्रण मिळविताना कर्नल आर. एस. पवार, सुरक्षा अधिकारी मेजर मनोज कुमार, नायक रणसिंग, शिपाई रामचंदर, सतीश सत्यप्रकाश या सैनिकांसह अग्निशमन दलाचे बाळू पाखरे, लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, अमोल एसनकर, अमित पुनिया, अरर्विंदसिंग, डी. के. यादव. डी. पी. मेश्राम, कृष्णकुमार, कुलदीपसिंग, नवज्योतसिंग, प्रमोद मेश्राम, एस. जी. बाळस्कर यांनी वीर मरण आले. शिवाय १९ जण या घटनेत गंभीर जखमी झाले होते. उल्लेखनीय म्हणजे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात काय पुढे आले या बाबत मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती.स्फोटक विनाशक स्थळ बदललेपूर्वी ज्या ठिकाणी स्फोटके निकामी केली जात ते ठिकाण आता पुलगावच्या दारूगोळा भंडाराने बदलविल्याची चर्चा आहे. सदर स्थळ पुनर्वसनाच्या मागणीनंतर बदलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगली जाते. सध्या केळापूर ते सोनेगाव शिवाराच्या दरम्यान सीएडी कॅम्पच्या कार्यक्षेत्रात स्फोटक विनाशक स्थळ तयार केले आहे.पुलगावच्या दारूगोळा भंडाराच्या सीमावर्ती परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट