वर्धा व पुलगावात महिलांची वर्णी
By Admin | Updated: December 23, 2015 02:39 IST2015-12-23T02:39:34+5:302015-12-23T02:39:34+5:30
जिल्ह्यात सहाही नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पार पडली. वर्धेत भाजपाने काँग्रेसशी हात मिळवणी करीत समित्यांवर ताबा मिळविला.

वर्धा व पुलगावात महिलांची वर्णी
सहाही नगर परिषद विषय समित्यांच्या निवडणुका
वर्धा : जिल्ह्यात सहाही नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी पार पडली. वर्धेत भाजपाने काँग्रेसशी हात मिळवणी करीत समित्यांवर ताबा मिळविला. वर्धा व पुलगाव येथे सर्वच समित्यांवर महिलांची वर्णी लागली. या दोनही पालिकांसह देवळी, हिंगणघाट व आर्वी येथे निवडणूक अविरोध झाली. पाच समितीच्या या निवडणुकीकडे सहाही पालिकेच्या सदस्यांचे लक्ष लागले होते. सत्ताधाऱ्यांनी सर्वच समित्या आपल्या हाती राहाव्या याकरिता गत काही दिवसांपासूनच मोर्चेबांधणीला प्रारंभ केला होता. यात वर्धेत राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे असताना भाजपाने हस्तक्षेप केल्याने त्यांची युती विस्कटून काँग्रेस व भाजपा युती झाली.(लोकमत न्यूज)