दौडमधून वर्धेकरांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
By Admin | Updated: November 1, 2014 02:08 IST2014-11-01T02:08:04+5:302014-11-01T02:08:04+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून वर्धेकरांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

दौडमधून वर्धेकरांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
वर्धा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून वर्धेकरांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच राष्ट्रीय एकता दिवसची शपथ घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशसनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रन फॉर युनिटी (एकता दौड) साठी जिल्हा क्रीडा संकुलावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी एस. बी. जाधव उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, होमगार्डचे जिल्हा समादेशक मोहन गुजरकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलावर सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसी कॅडेट, महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशहितार्थ शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एन. नवीन सोना राष्ट्रीय एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा क्रीडा संकुल, इतवारा चौक, सुभाषचंद्र बोस पुतळा, मार्केट कच्छी लाईन, मेन रोड, निर्मल बेकरी चौक, मार्केट रोड, अंबिका हॉटेल चौकमार्गे सरदार वल्लभभाई पटेल पुतळा चौक यामार्गे दौड काढण्यात आली. चौकातील ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, मुख्य कार्यकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.अभिवादनानंतर दौड जिल्हा क्रीडा संकुलावर एकत्रित आल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन अजय येते यांनी केले.सायंकाळी पोलीस प्रशासनातर्फे लाँग मार्च काढण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)