जात प्रमाणपत्रासाठी भटकंती
By Admin | Updated: July 12, 2014 01:41 IST2014-07-12T01:41:24+5:302014-07-12T01:41:24+5:30
विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता लागणारे जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे.

जात प्रमाणपत्रासाठी भटकंती
सेलू : विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता लागणारे जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. या विद्यार्थ्यांना आर्थिक विचंबना सहन करीत व्याजाने पैसे घेऊन दंड भरावा लागत आहे. सेलू तहसील कार्यालयातील विविधामधील कर्मचारी विद्यार्थ्यांकडून जातीच्या दाखल्याचे कागदपत्र तयार करण्याकरिता अतोनात पैसे घेत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता लागणारा जातीचा दाखला वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापाूसन वंचित रहावे लागत आहे. जातीचा दाखल न मिळाल्याने अनेकांना अभियांत्रिकेच्या प्रवेशाकरिता कागदपत्र पडताळणीच्यावेळी एका दिवसाकरिता ५०० रुपये दंड भरावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. साबतच विद्यार्थ्यांना आर्थिक त्रासही सहन करत व्याजाने पैसे घेवून दंड भरावा लागत आहे. सेलू तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना गत एक ते दीड महिन्यापासून जातीचे दाखले अजूनही मिळाले नाही. जातीचा दाखला तयार झाला की नाही याबाबत चौकशी करण्याकरिता विद्यार्थी गेले असता विविधाचे कर्मचारी विद्यार्थ्यांना साहेबांची सही व्हायची आहे, आम्ही पूर्ण केसेस पाठविलेल्या आहे, तुम्ही उपविभागीय कार्यालयात लावून चौकशी करा अशी एका ना अनेक उत्तरे विद्यार्थीना देतात. वास्तविकतेत ते प्रकरण त्यांच्याच कार्यालयात असते. त्यांना पैसे दिल्या जात नसल्याने ते दिल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास देतात आसा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
तहसील कार्यालयाच्या विविधामधील कर्मचारी विद्यार्थ्यांकडून जातीचे दाखल्याचे निवेदन तयार करून देण्यासाठी अतोनात पैसे उकळत आहेत. उका दाखल्याकरिता बनविण्याकरिता ५०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. जे पैसे देतात त्यांना पाच दिवसात जातीचा दाखला मिळतो. पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना २० ते २५ दिवस होवूनही दाखला मिळत नाही. हा भोंगळ कारभार अनेक दिवसापासून सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना १० दिवसाच्या आत जातीचे दाखले त्वरीत न मिळाल्यास व सेलू तहसील कार्यालयामधील विविधाच्या कर्मचाऱ्यांच्या भोंगाळ कारभाराची चौकशी करून तो भोंगळ कारभार बंद करण्यात यावा अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यावेळी दिला. शिष्टमंडळात मनविसेचे शुभम दांडेकर, राहूल सोरटे, बबलू बोरकर, करण पाठक, सोनू लांजेवार, सर्कल अध्यक्ष सुरज ठोंबरे, राहूल जाधव, सागर करनाके, लोकेश ठोंबरे, प्रविण शिंदे, विशाल भुरे, आदित्य धवणे, भुषण बोरकर, नितीन देवरे, रजत महाडोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)