भिंतीवर भिंत कोसळली...
By Admin | Updated: September 22, 2016 01:15 IST2016-09-22T01:15:59+5:302016-09-22T01:15:59+5:30
नजीकच्या जामणी येथे सुरक्षा भिंतीवर दुसरी भिंत कोसळून सुरक्षा भिंत पडल्यामुळे सुभाष राऊत यांचे नुकसान झाले.

भिंतीवर भिंत कोसळली...
आकोली - नजीकच्या जामणी येथे सुरक्षा भिंतीवर दुसरी भिंत कोसळून सुरक्षा भिंत पडल्यामुळे सुभाष राऊत यांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसामुळे घडली. यामध्ये गजानन डांगे यांच्या घराची भिंत राऊत यांच्या घराच्या भिंतीवर पदली. असा प्रकार घडूनही येळीकेळी येथील तलाठी चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी न केल्याचे सरपंच इंद्रजित धुर्वे यांनी सांगितले. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी तलाठ्याला पंचनामा करून नुकसान भरपाई बाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. पावसामुळे गावातील अनेक जुन्या घराचे असेल हाल आहेत. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.