शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाणी फाऊंडेशनच्या रकमेची पुरस्कारविजेत्या गावाला प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:44 PM

५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला होता धनादेशपॅनकार्ड नसण्याने अडचणवर्धा जिल्ह्यातील काकडदरा राज्यातले पहिले पाणीदार गाव

आॅनलाईन लोकमतवर्धा : ५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही. ग्रामसभेचा ठराव नसल्यामुळे गावाचे पॅनकार्ड काढण्यास अडचण आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गावकºयांसोबत पुरस्कार घेण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आता ‘इव्हेंट संपल्याने’ गावाकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले.कोलाम समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आर्वी तालुक्यातील काकडदरा या अतिदुर्गम गावाने १९८८ मध्ये जलसंधारणाच्या कामाची मूर्तमढ रोवली. त्यावेळी असेफा या संघटनेच्या मार्फत मधुकरराव खडसे यांनी येथील ग्रामस्थांना जलसंधारणाचा मुलमंत्र दिला. तेव्हापासून काकडदºयाचे ग्रामस्थ दरवर्षी जलसंधारणाचे काम करत आले. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरूवात झाली. त्यावेळी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना या कामासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. व काकडदराचाही त्यात समावेश होता. या गावातील नागरिकांना श्रमदान व जलसंधारण याची पूर्ण जाण असल्याने या गावावर पाणी फाऊंडेशनने लक्ष केंद्रीत केले. व या गावाने ५० लाख रूपयाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पटकाविला. व हे गाव राज्यात पहिले पाणीदार गाव ठरले. यावेळी ग्रामस्थांच्या सोबत पाणी फाऊंडेशनचे कार्यकर्तेही पुरस्कार घेण्यासाठी होते. परंतु, जवळ-जवळ चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही काकडदºयाला पुरस्काराची रक्कम अजूनही मिळालेली नाही. ग्रामसभेचा ठराव घेवून ग्रामसभेचे पॅनकार्ड काढावे लागणार आहे. ते नसल्यामुळे पुरस्काराची रक्कम ग्रामस्थांना देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शासनाप्रती प्रचंड नाराजी पसरली आहे. पाणी फाऊंडेशनने इव्हेंट म्हणून या गावाचा वापर करून घेतला. परंतु, या गावाच्या समस्या सरकार दरबारी ग्रामस्थांना मांडू दिल्या नाही. ही बाब श्रीकृष्णदास जाजू स्मृति कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधल्यावर उघडकीस आली. या गावासाठी पूर्वीपासून झटणाºया लोकांनाही दुर्लक्षित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. आता ग्रामपंचायत व ग्रामसभा या दोघांच्याही ठरावानंतर गावाचे पॅनकार्ड तयार करण्याचे काम तयार करण्यात येणार असल्याचे गावाचे प्रमुख कार्यकर्ते दौलत घोरनाडे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे यांनीही पॅनकार्ड नसल्यामुळे पुरस्काराची रक्कम अद्याप मिळाली नसल्याच्या बाबीला दुजोरा दिला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस