‘त्या’ रस्त्याला नूतनीकरणाची प्रतीक्षा

By Admin | Updated: November 16, 2015 00:39 IST2015-11-16T00:39:40+5:302015-11-16T00:39:40+5:30

विदर्भाचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथील रस्त्याचे नूतनीकरण कारण्यासाठी १४ महिन्याअगोदर भूमिपूजन झाले.

Waiting for a new road to 'that' road | ‘त्या’ रस्त्याला नूतनीकरणाची प्रतीक्षा

‘त्या’ रस्त्याला नूतनीकरणाची प्रतीक्षा

उदासीनता : अल्पावधीतच रस्ता उखडला
सेलू : विदर्भाचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथील रस्त्याचे नूतनीकरण कारण्यासाठी १४ महिन्याअगोदर भूमिपूजन झाले. परंतु अद्यापही या कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांना नूतनीकरणाची प्रतीक्षा कायम आहे.
विठ्ठल रुख्माई देवस्थान ते संत नामदेव महाराज समाधी पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम तात्कालीन खासदार सुरेश वाघमारे यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते. पण अल्पावधीतच त्या रस्त्याचे तीन तेरा वाजले. त्यानंतर पुन्हा या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याअगोदर खासदार रामदास तडस, जि.प. सदस्य राणा रणनवरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाला आता १४ महिन्याचा कालावधी लोटला. अवघ्या दोन महिन्यावर संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आला आहे.हा पालखी मार्ग असून या महोत्सवाकरिता विदर्भातून बहुसंख्य भाविक येत असतात. त्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परिणामी या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Waiting for a new road to 'that' road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.