सात महिन्यांपासून हरितगृहाची प्रतीक्षा
By Admin | Updated: December 22, 2014 22:53 IST2014-12-22T22:53:49+5:302014-12-22T22:53:49+5:30
आकोली परिसरातील धानोली (गावंडे) येथील एका शेतकऱ्याने हरीतगृह उभारण्याचे कंत्राट पुण्याच्या एका कंपनीला दिला. रितसर पैसेही भरले, परंतु सात महिने लोटूनही कंपनीने अद्याप हरितगृह उभारायला

सात महिन्यांपासून हरितगृहाची प्रतीक्षा
वर्धा : आकोली परिसरातील धानोली (गावंडे) येथील एका शेतकऱ्याने हरीतगृह उभारण्याचे कंत्राट पुण्याच्या एका कंपनीला दिला. रितसर पैसेही भरले, परंतु सात महिने लोटूनही कंपनीने अद्याप हरितगृह उभारायला सुरुवात केली नाही.
पुंडलिक शेंडे असे सदर शेतकऱ्याने नाव असून सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीद्वारे कृषी विभागाकडे केली आहे. राज्यशासनाच्या कृषी विभागाने ३८ कपंन्यांना हरितगृह बांधकामासाठी अधिकृत केले आहे. शिवाय त्या कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकही देण्याचे काम करण्यात येते. यात तळेगाव दाभाडे येथील अनंत ग्रीन हाऊस कंपनीत धानोली (गावंडे) येथील पुंडलिक शेंडे या शेतकऱ्याने रक्कम भरली. या बाबीला सात महिने लोटले. शेतात अद्यापही हरितगृह उभारण्यात आलेले नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज घेवून, तसेच राहते घर व शेती गहाण ठेवून ७ लाख २६ हजार रुपये दोन टप्प्यात सदर कंपनीकडे जमा केले. नंतर हरितगृहासाठी लागणारे साहित्य पाठवून कुशल कामगारांकडून हरितगृहाची बांधणी करणे गरजेचे होते. एक ते दीड महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात सात महिने पूर्ण होऊनही बांधकाम करण्यात आले नाही. विलंबामुळे शेंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कृषी विभागाने सदर कंपनीला पत्र दिले पण अद्याप कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. बॅकेचेही हप्ते भरावे लागत असल्याने शेतकरी चिंतेत पडला. (शहर प्रतिनिधी)