दीड हजार शेतकर्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 7, 2014 02:29 IST2014-05-07T02:29:04+5:302014-05-07T02:29:04+5:30
आर्वी शासन व कृषी विभागाच्यावतीने कोरडवाहू शेतकर्यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडत आहे.

दीड हजार शेतकर्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा
सिंचन रखडले : आर्वी उपविभागात दीड हजार शेतकरी रांगेत
सुरेंद्र डाफ
आर्वी शासन व कृषी विभागाच्यावतीने कोरडवाहू शेतकर्यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडत आहे. असे असताना वीज वितरण कंपनीकडून शेतकर्यांच्या कृषी पंपांना जोडणी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. आर्वी उपविभागातील दीड हजार शेतकर्यांना गत चार वर्षांपासून कृषीपंपाची जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आर्वी येथे वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, रोहणा, खरांगणा या भागातील वीज जोडणी वा इतर कामे करण्यात येते. या कार्यालयात शेतात सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी २०११ या वर्षात वितरण कंपनीकडे कृषी पंपाकरिता वीज जोडणीचे अर्ज सादर करण्यात आले. यात आर्वी ३८५, कारंजा (घा.) ३४३, आष्टी (श.)१३६, पुलगाव २४१, खरांगणा २४९ अशा एकूण दीड शेतकर्यांचा यात समावेश आहे.
२०११-१२ च्या प्रतीक्षा यादीत शेतकर्यांना वीज जोडणी देणार असल्याचे कळविले; परंतु अद्यापही या शेतकर्यांची प्रतीक्षा संपलेली नाही. यावर वीज कंपनीने तातडीने करण्याची मागणी आहे.
कृषी पंपाची वीज जोडणी यादी प्रलंबीत आहे, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. -निलेश गायकवाड, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, आर्वी.